• Download App
    देशातील 4 राज्यांत पाऊस आणि वादळाने विध्वंस; पश्चिम बंगालमध्ये 4 ठार, 100 जखमी; आसाममध्ये एअरपोर्टचे छत कोसळले|Rains and storms wreak havoc in 4 states of the country; 4 killed, 100 injured in West Bengal; Airport roof collapses in Assam

    देशातील 4 राज्यांत पाऊस आणि वादळाने विध्वंस; पश्चिम बंगालमध्ये 4 ठार, 100 जखमी; आसाममध्ये एअरपोर्टचे छत कोसळले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रविवारी अचानक आलेल्या वादळ आणि पावसाने देशातील चार राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे चार जणांचा मृत्यू झाला. तर 100 जण जखमी झाले आहेत.Rains and storms wreak havoc in 4 states of the country; 4 killed, 100 injured in West Bengal; Airport roof collapses in Assam

    मुसळधार पावसामुळे आसाममधील गुवाहाटी येथील गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठे नुकसान झाले आहे. विमानतळाच्या छताचा काही भाग कोसळला. त्यामुळे काही काळ विमान वाहतूक बंद करण्यात आली. तर सहा उड्डाणे वळवावी लागली.



    मिझोराममधील चंफई जिल्ह्यातील लुंगटान गावात चर्चची इमारत कोसळली. आयझॉल जिल्ह्यातील सियालसुक येथे आणखी एका चर्चच्या इमारतीचे नुकसान झाले. याशिवाय काही घरांचेही अंशत: नुकसान झाले आहे.

    दुसरीकडे, मणिपूरच्या थौबल आणि खोंगजोम भागात अनेक झाडे उन्मळून पडली आणि घरांच्या कौलाचे छत उडून गेले.

    पश्चिम बंगालमध्ये वादळ आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मैनागुरीतील अनेक भागात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांबही पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वाधिक प्रभावित भागात राजारहाट, बरनीश, बकाली, जोरपकडी, माधबडंगा आणि साप्तीबारी यांचा समावेश आहे.

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले: “आज दुपारी अचानक मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जलपाईगुडी-मायनागुरीच्या काही भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हे जाणून वाईट वाटते. पीडितांना भरपाई दिली जाईल.

    Rains and storms wreak havoc in 4 states of the country; 4 killed, 100 injured in West Bengal; Airport roof collapses in Assam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!