• Download App
    राहुल + प्रियांकांच्या वायनाडमधल्या विजयात Rahul + Priyanka's victory in Wayanad: hand of Muslim fundamentalists; Allegation of Marxist Communist Party, not BJP!!

    राहुल + प्रियांकांच्या वायनाडमधल्या विजयात मुस्लिम कट्टरपंथीयांचा हात; भाजपचा नव्हे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा आरोप!!

    Wayanad

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वायनाड मधल्या विजयात बाकी कोणाचा नव्हे, पण मुस्लिम कट्टरपंथीयांचा हात होता, असा गंभीर आरोप भाजपच्या कुठल्या नेत्याने नव्हे, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी केला. याच कम्युनिस्ट पार्टीचे नेते मुस्लिम कट्टरपंथीयांबरोबर हातमिळवणी करून केरळवर राज्य करत आहेत.



     

    केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी विजयी झाले. परंतु त्यांनी आपली अमेठीची जागा कायम ठेवत वायनाड मधून राजीनामा दिला. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी विजयी झाल्या. त्यांना इंडियन युनियन मुस्लिम लीगने पाठिंबा दिला होता.

    त्या पलीकडे जाऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विजय राघवन यांनी गांधी परिवारावर मुस्लिम कट्टरपंथीयांच्या मदतीने विजय मिळवण्याचा आरोप केला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी वायनाड मध्ये मोठे मताधिक्य मिळवल्याचा दावा करतात, पण त्यांच्या प्रचारात पुढे मागे कोण फिरत होते, हे सगळ्या देशाला माहिती आहे. मुस्लिम कट्टरपंथींयांच्या बळावर त्यांनी विजय मिळवला. हे कट्टरपंथीय एरवी देशाविरोधी कारवायांमध्ये मग्न असतात. पण राहुल आणि प्रियांका गांधी त्यांनाच जवळ करतात, असा आरोप विजय राघवन यांनी केला.

    Rahul + Priyanka’s victory in Wayanad: hand of Muslim fundamentalists; Allegation of Marxist Communist Party, not BJP!!

    महत्वाच्या बातम्या

    
    					

    Related posts

    SSC : SSC चुकीच्या प्रश्नावर पूर्ण गुण देणार; ऑब्जेक्शन मॅनेजमेंट सिस्टम 2026 सुरू

    PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- बंगाल बदलासाठी तयार; TMCच्या भयाच्या राजवटीला हटवणार

    Delhi Police :दिल्लीत 50 हजारांचे बक्षीस असलेल्या महिला ड्रग्ज तस्करला अटक; पोलिसांनी 200 CCTV, 100 मोबाईल तपासले; 11 गुन्हे दाखल