विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वायनाड मधल्या विजयात बाकी कोणाचा नव्हे, पण मुस्लिम कट्टरपंथीयांचा हात होता, असा गंभीर आरोप भाजपच्या कुठल्या नेत्याने नव्हे, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी केला. याच कम्युनिस्ट पार्टीचे नेते मुस्लिम कट्टरपंथीयांबरोबर हातमिळवणी करून केरळवर राज्य करत आहेत.
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी विजयी झाले. परंतु त्यांनी आपली अमेठीची जागा कायम ठेवत वायनाड मधून राजीनामा दिला. त्यामुळे तिथे पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी विजयी झाल्या. त्यांना इंडियन युनियन मुस्लिम लीगने पाठिंबा दिला होता.
त्या पलीकडे जाऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विजय राघवन यांनी गांधी परिवारावर मुस्लिम कट्टरपंथीयांच्या मदतीने विजय मिळवण्याचा आरोप केला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी वायनाड मध्ये मोठे मताधिक्य मिळवल्याचा दावा करतात, पण त्यांच्या प्रचारात पुढे मागे कोण फिरत होते, हे सगळ्या देशाला माहिती आहे. मुस्लिम कट्टरपंथींयांच्या बळावर त्यांनी विजय मिळवला. हे कट्टरपंथीय एरवी देशाविरोधी कारवायांमध्ये मग्न असतात. पण राहुल आणि प्रियांका गांधी त्यांनाच जवळ करतात, असा आरोप विजय राघवन यांनी केला.