• Download App
    राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती; काँग्रेसमध्ये अस्वस्थता!! Rahul Gandhi's helicopter searched by election officials in Tamil Nadu

    राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत निवडणूक अधिकाऱ्यांकडून झडती; काँग्रेसमध्ये अस्वस्थता!!

    वृत्तसंस्था

    निलगिरी : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या दौऱ्यावर पोचताच तिथे निवडणूक अधिकाऱ्यांनी हेलीपॅड वर जाऊन राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. या झडतीत निवडणूक अधिकाऱ्यांना काही आढळले किंवा नाही याविषयी तपशील अजून बाहेर आलेले नाहीत, पण काँग्रेसजनांमध्ये मात्र या झडतीमुळे प्रचंड अस्वस्थता पसरली. Rahul Gandhi’s helicopter searched by election officials in Tamil Nadu

    राहुल गांधींचे हेलिकॉप्टर आज तामिळनाडूतील निलगिरी येथे पोहोचले. हेलीपॅड वर नेहमीप्रमाणे सुरक्षेसाठी तामिळनाडूचे पोलीस उपस्थित होते. या पोलिसांच्या उपस्थितीत काही निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतली. या झडतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांना काही वेगळे आढळले किंवा नाही याचे तपशील अजून बाहेर आलेले नाहीत

    पण दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टर मधून उतरून स्वतः राहुल गांधी कार मध्ये बसून दौऱ्यावर रवाना झाले. तामिळनाडूतून ते केरळ मधल्या वायनाड मध्ये देखील पोहोचले. त्यांनी ठिकठिकाणी रोड शो करत काही ठिकाणी जनतेला संबोधित देखील केले, पण त्यांच्या हेलिकॉप्टरची झडती झाल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र अस्वस्थता पसरली.

    अनेक बड्या नेत्यांच्या बड्या वाहनांमध्ये नोटांची बंडले असलेली पोती सापडत आहेत. मोठमोठ्या खोक्यांमध्ये नोटा ठेवलेल्या आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचे झडती झाल्याने पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे.

    Rahul Gandhi’s helicopter searched by election officials in Tamil Nadu

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही