• Download App
    Rahul Gandhi's attack on BJP or did he himself confess to BJP's allegations?? मी तर जामिनावर बाहेर; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच दिली कबुली??

    मी तर जामिनावर बाहेर; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच दिली कबुली??

    Rahul Gandhi

    नाशिक : मी तर जामिनावर बाहेर आहे, असे सांगून राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केला, की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच कबुली देऊन टाकली??, असा सवाल राहुल गांधींच्या आजच्या केरळ मधल्या भाषणातून समोर आला.Rahul Gandhi’s attack on BJP or did he himself confess to BJP’s allegations??

    केरळ विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधींची पलक्कड मध्ये सभा झाली. या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वतःविषयी जे उद्गार काढले त्यावरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला की भाजपने आत्तापर्यंत केलेल्या आरोपांवरून स्वतःच कबुली देऊन टाकली??, असा सवाल समोर आला.



    – राहुल गांधींचे भाषण

    राहुल गांधी म्हणाले, मी फक्त एकटाच भाजप विरुद्ध लढतोय. भाजपने माझ्या पाठीमागे ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट लावले. ईडीने माझी 55 वेळा चौकशी आणि तपास केला. मी तुमच्यासमोर भाषण करतोय, पण मी सध्या जामीनावर बाहेर आहे. मी भाजप विरुद्ध बोलतो म्हणून मी ईडी आणि इन्कम टॅक्स च्या टार्गेटवर कायम राहिलोय. भाजपने माझी लोकसभेची खासदारकी रद्द केली. माझे सरकारी निवासस्थान काढून घेतले. भाजपच्या सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मिर असा 4000 किलोमीटर चाललो. पण भाजपने अजून केरळच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना हात लावलेला नाही. कारण भाजप आणि कम्युनिस्ट पार्टी यांनी आतून एकमेकांशी संधान बांधले आहे. ते एकमेकांना बिलकुल हात लावत नाहीत. ते फक्त काँग्रेसच्या नेत्यांना छळतात. कारण काँग्रेसचे नेते जनतेच्या बाजूने उभे राहून भाजप आणि कम्युनिस्ट सरकारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात.

    – भाजपच्या नेत्यांचे हेच तर आरोप

    राहुल गांधींनी हे भाषण करून जामिनावर बाहेर असल्याची कबुली दिली. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसचे अन्य नेत्यांवर हाच तर आरोप केला होता, की ते जामिनावर बाहेर आहेत म्हणून जनतेशी बोलू शकतात. काँग्रेसने आणि राहुल गांधींनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले. त्या खटल्यांमध्ये न्यायालयाने त्यांना जामीन दिला म्हणून ते बाहेर आहेत, असे नरेंद्र मोदी आणि बाकीच्या भाजपच्या नेत्यांनी वारंवार सांगितले होते. त्यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या सगळ्या आरोपांचा इन्कार केला होता.

    – स्वतःवरच उडवून घेतले आरोपांचे शिंतोडे

    पण आज पलक्कड मधल्या सभेत मात्र राहुल गांधींनी स्वतःहून जामिनावर असल्याची कबुली देऊन टाकली. ईडीने आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तब्बल 55 वेळा चौकशी आणि तपास केल्याची माहिती सांगितली, याचा अर्थ त्यांनी उघडपणे स्वतःच्या भ्रष्टाचाराचीच कबुली देऊन टाकली. त्यामुळेच राहुल गांधींनी काँग्रेसच्या प्रचाराचे भाषण करताना भाजपवर तोफा डागल्या की स्वतःवरच स्वतःच आरोपांचे शिंतोडे उडवून घेतले??, असा सवाल समोर आला.

    Rahul Gandhi’s attack on BJP or did he himself confess to BJP’s allegations??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    “कवडीची किंमत देत नाही” ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”; शरद पवारांचा पार्थ वर राग कायम!!

    Jeffrey Epstein :अनिल अंबानींसमोर एपस्टीनने स्वतःला व्हाइट हाऊसचा ‘इनसायडर’ सांगितले; नियुक्ती-परराष्ट्र धोरणाशी संबंधित माहिती शेअर केली होती

    बारामतीत पवारांच्या मक्तेदारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आव्हान दिल्याबरोबर पार्थ पवारांची दमबाजीची भाषा; काँग्रेसचा downfall “दिसला”!!