• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधींचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटेनात,

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटेनात, मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावर कर्नाटकातील मंत्र्याचा सवाल

    Rahul Gandhi

    विशेष प्रतिनिधी

    बेंगळुरू : Rahul Gandhi काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले आहेत. पण हे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेस सत्तेत असतानाच तयार झालेल्या मतदार यादीतील कथित फेरफारांवर आता आक्षेप घेणाऱ्या पक्षाच्या भूमिकेवर कर्नाटकाचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Rahul Gandhi

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच लोकसभा निवडणुकांदरम्यान “व्होट चोरी” झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर केला होता. मात्र, या यादीचा मसुदा तयार होत असताना काँग्रेसने काहीच आक्षेप घेतला नाही, असे ते म्हणाले.Rahul Gandhi

    “मसुदा यादी तयार होत असताना तपासणी करणे ही आपली जबाबदारी नव्हती का? जर अनियमितता होती, तर आपण शांत का बसलो?” असा थेट सवाल राजन्ना यांनी आपल्या पक्षातील सहकाऱ्यांनाच केला. त्यांनी सांगितले की, “या अनियमितता आपल्या डोळ्यांसमोर घडल्या, त्यावर त्या वेळी मौन बाळगणे हे लाजिरवाणे आहे. आपण हे मान्य करायला हवे आणि पुढे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अधिक सतर्क राहायला हवे.”Rahul Gandhi



    राहुल गांधींनी अलीकडेच कर्नाटकातील महादेवपूरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट व खोट्या पत्त्यांचे मतदार असल्याचा आरोप केला होता. त्यांनी दाखवलेल्या आकडेवारीनुसार, ६.५ लाख मतदारांपैकी एक लाखाहून अधिक मतदारांची नावे बनावट किंवा चुकीच्या पत्त्यांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला.

    मात्र स्थानिक बीएलओ (Booth Level Officer) मुनिरत्ना यांनी या दाव्याचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित घर हे भाड्याने देण्यात येणारे असून गेल्या १४ वर्षांत सतत वेगवेगळे भाडेकरू राहत होते. अनेक स्थलांतरित कामगारांनी भाडेकरारावरून मतदार ओळखपत्र घेतले, पण नंतर पत्ता बदलला तरी मतदार यादीत बदल केला नाही. या नावांची यादी आधीच निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली असून ती वगळली जाणार आहे.

    यामुळे एकाच पत्त्यावर अनेक नावे असल्याचे दिसले, पण त्याचा अर्थ असा नाही की सर्वजण एकाच वेळी तिथे राहत होते किंवा कोणताही संघटित गैरप्रकार झाला होता. तरीसुद्धा राहुल गांधींनी याला “व्होट चोरी”चे पुरावे म्हणून मांडले आणि भाजपला याचा फायदा झाल्याचा आरोप केला.

    राजन्ना यांच्या या थेट वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात पक्ष किती काळजीपूर्वक वागतो आणि भूतकाळातील चुका उघडपणे मान्य करण्याची तयारी किती आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    Rahul Gandhi’s allegations are not confined to Congress leaders, Karnataka minister questions allegations of irregularities in voter list

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Russia : रशिया भारताला अधिक S-400 संरक्षण प्रणाली देणार; रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले- सहकार्य वाढत आहे

    Manipur : मणिपूर-नागालँड राष्ट्रीय महामार्ग पुन्हा खुला होणार; हिंसाचारानंतर दोन वर्षांपासून बंद होता मार्ग

    Ruckus in West Bengal Assembly : पश्चिम बंगाल विधानसभेत हंगामा: आमदार-सुरक्षारक्षकांमध्ये हातापायी