• Download App
    राहुल गांधी तुमची चवच विभाजनवादी. योगी आदित्यनाथ, मौर्य यांची सडकून टीका। Rahul Gandhi, your taste is divisive. Criticism of Yogi Adityanath, Maurya

    राहुल गांधी तुमची चवच विभाजनवादी. योगी आदित्यनाथ, मौर्य यांची सडकून टीका

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – राहुल गांधी तुमची चवच विभाजनवादी आहे, जी साऱ्या देशाला ठाऊक आहे. आंब्यातही तुम्ही प्रांताच्या आधारावर भेद केला आहे, पण एक लक्षात घ्या की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतातील चव एकच आहे अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना फटकारले आहे. Rahul Gandhi, your taste is divisive. Criticism of Yogi Adityanath, Maurya

    आपल्याला उत्तर प्रदेशचे नव्हे तर आंध्र प्रदेशचे आंबे आवडतात, असे राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य म्हणाले की, राहुल यांना आमच्या राज्यातील आंबे का आवडत नाहीत हे आम्ही समजू शकतो.



    याचे कारण आमच्या भगिनी स्मृती इराणी यांनी मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या बालेकिल्ल्यास सुरुंग लावताना राहुल यांना पराभूत केले. अखेर राहुल यांना दूरच्या राज्यात जाऊन प्रतिष्ठा वाचवावी लागली. कृपा करून तुमच्या आंब्याची पसंती सांगून उत्तर प्रदेशचा अपमान करू नका. तुम्हा जर येथील आंबे आवडत नाहीत तर मग काय विदेशी मद्य आवडते का असा खोचक सवालही त्यांनी केला.

    Rahul Gandhi, your taste is divisive. Criticism of Yogi Adityanath, Maurya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे