प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे रविवारी देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन केले जात आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व राज्यांतील जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर महात्मा गांधीं यांच्या पुतळ्यासमोर पक्षाचे बडे नेते आणि कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महासचिव प्रियंका गांधी सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी दिल्लीतील राजघाटावर पोहोचले. दिल्ली पोलिसांनी येथे कलम 144 लागू केले असले तरी कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहे. सायंकाळी 5 वाजता या आंदोलनाची सांगता होईल.Rahul Gandhi wrote in his Twitter profile Unqualified MP Priyanka’s attack from Rajghat
- राहुल गांधींवर झालेल्या कारवाईबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना म्हटले धन्यवाद, कारण…
देशाचे PM घाबरट- प्रियंका गांधी
सत्याग्रह दरम्यान प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधत आजपर्यंत आम्ही गप्प बसलो, तुम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान करत राहिलात, असे म्हटले. माझा भाऊ म्हणाला- मी तुमचा तिरस्कार करत नाही. आमची विचारधारा वेगळी आहे. मला विचारायचे आहे की, तुम्ही माणसाचा किती अपमान कराल, माझ्यावर गुन्हा दाखल करा. पण यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या देशाचे पंतप्रधान हे घाबरट आहेत.
प्रियांका पुढे म्हणाल्या की, आजपर्यंत आम्ही गप्प बसलो, तुम्ही आमच्या कुटुंबाचा अपमान करत राहिलात. माझा भाऊ म्हणाला – मी तुमचा तिरस्कार करत नाही. फक्त आपली विचारधारा वेगळी आहे. मला विचारायचे आहे की, तुम्ही माणसाचा किती अपमान कराल.
भगवान राम आणि पांडव कुटुंबवादी होते का? आमचे कुटुंब देशासाठी शहीद झाले तर आम्हाला लाज वाटली पाहिजे का? जे आमचा अपमान करत आहे आणि आम्हाला घाबरवत आहात.
त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही अधिक ताकदीने लढू. आम्ही आजही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आपली सर्व संपत्ती लुटली जात असल्याचे देशातील जनतेला दिसत नाही. जे हुकूमशहा असतात ते प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना नेहमी दाबण्याचा प्रयत्न करतात. या अदानीमध्ये असे काय आहे की, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही अदानींना का वाचवत आहात. विचार करायला हवा. एक माणूस कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत का चालला. राहुल गांधींनी विदेशात जाऊन देशाचा अपमान केला, असे आज मीडिया, मंत्री, खासदार सांगू लागले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
Rahul Gandhi wrote in his Twitter profile Unqualified MP Priyanka’s attack from Rajghat
महत्वाच्या बातम्या
- Pakistan Economy News: रमजानमध्ये पाकिस्तानात महागाईमुळे सर्वत्र हाहाकार; केळी ५०० रुपये डझन, तर द्राक्षे तब्बल १६०० रुपये किलो
- राहुल गांधींवर झालेल्या कारवाईबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना म्हटले धन्यवाद, कारण…
- सावरकरांचा अपमान करू नका, राहुल गांधींना इशाऱ्याचे उद्धव ठाकरेंचे मालेगावचे भाषण; महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या एक्झिटची नांदी
- सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, पण भाजप विरुद्ध एकत्र लढू; मालेगावच्या सभेत राहुल गांधींना इशारा देताना उद्धव ठाकरेंची तारेवरची कसरत