संसदेचे हिवाळी अधिवेशानातही दिसणार अनुपस्थिती, काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर!
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. या राज्यांमध्ये भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष पराभवाच्या धक्क्यात असताना आता काँग्रेसचे प्रमुख नेते आणि माजी अध्यक्ष परदेश दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. Rahul Gandhi will go on a foreign tour when the Congress is in the shock of defeat in three states
दरम्यान, राहुल गांधी ९ डिसेंबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. ते इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया आणि व्हिएतनामच्या दौऱ्यावर असतील. राहुल यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि यासोबतच संसदेचे हिवाळी अधिवेशनही सुरू आहे.
यामुळे काँग्रेसचे नेत्यांमध्येच नाराजी दिसत आहे . अशा प्रसंगी राहुल गांधींनी पराभवाच्या कारणांचा विचार करायला हवा. अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि कमलनाथ यांच्या चुकांची चर्चा व्हायला हवी. या तीन नेत्यांमुळे काँग्रेसला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हायकमांडला अंधारात ठेवून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चांगल्या कामगिरीचे चित्र दाखविल्याचा आरोप तिन्ही मुख्यमंत्र्यांवर होत आहे. खरगे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. पण प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयासाठी ते राहुल गांधींवर अवलंबून असतात हे सर्वांना माहीत आहे. या पराभवानंतर पक्षाला खरंतर सावरण्याची गरज आहे, मात्र राहुल गांधी 9 ते 14 डिसेंबर दरम्यान परदेश दौऱ्यावर असणार आहेत. पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की खरगे आणि राहुल गांधी यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या कॉंग्रेस प्रमुखांसह कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास उशीर करू नये.
Rahul Gandhi will go on a foreign tour when the Congress is in the shock of defeat in three states
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!