विशेष प्रतिनिधी
भिवंडी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) बदनामी केल्याचा दावा करणारे राजेश कुंटे साक्ष देण्यात विलंब करत असल्याने न्यायालयाने त्यांना हजार रुपयांची दंड ठोठावला आहे. ही रक्कम कॉँग्रेसचे नेते राहूल गांधी यांना मिळणार आहे.Rahul Gandhi will get Rs 1,000 in RSS defamation case
या खटल्यात साक्ष नोंदविण्यास टाळाटाळ केल्याने कुंटे यांना भिवंडी न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम राहुल गांधी यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.भिवंडी न्यायालयात याप्रकरणी न्यायाधीश जे. व्ही. पालिवाल यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. २१ एप्रिलला भिवंडी न्यायालयात नियमित सुनावणीदरम्यान कुंटे यांनी पुन्हा पुढील तारीख मागितली.
मात्र, राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्यासंदर्भात दाखल याचिका नियमित सुनावणी घेऊन लवकरात लवकर निकाली काढाव्यात, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र, या खटल्यात कुंटे हे विलंब करत असल्याने त्यांना न्यायालयाने एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
२३ मार्चला याचिकाकर्ते कुंटे यांनी साक्ष न नोंदविता त्यास विलंब केल्याने ५०० रुपये दंड ठोठावला. ही रक्कम राहुल गांधी यांना देण्याचे आदेश दिले. पण, कुंटे यांनी पैसे भरले नसल्याची माहिती राहुल गांधी यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी दिली आहे. , या खटल्याची पुढील सुनावणी १० मे रोजी होणार आहे.
Rahul Gandhi will get Rs 1,000 in RSS defamation case
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!