विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi वड्याचे तेल वांग्यावर काढून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता पुढची भारत जोडो यात्रा बॅलेट पेपरवर काढणार आहेत.Rahul Gandhi
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सकट महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यामुळे प्रचंड संतप्त झालेल्या काँग्रेसजनांना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपला हा संताप आणि राग कुठे काढायचा हे समजेनासे झाल्यामुळे त्यांनी तो नेहमीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम वर काढला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएम विरुद्ध जोरदार आवाज उठवला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर काँग्रेस ईव्हीएम विरोधात देशव्यापी चळवळ उभारण्याची घोषणा केली.
राहुल गांधी ईव्हीएम विरोधात भारत जोडो यात्रेसारखे मोठी यात्रा काढतील, अशी घोषणाच त्यांनी संविधान दिनाच्या कार्यक्रमात करून टाकली. त्यामुळे आता देशातल्या सगळ्या निवडणुका या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर घेण्याऐवजी त्या बॅलेट पेपरवर व्हाव्यात, अशी मागणी घेऊन राहुल गांधी संपूर्ण भारतभर देश जोडायला निघणार आहेत. त्यांच्या या बॅलेट पेपर भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात अभूतपूर्व स्वागत होईल, अशी ग्वाही पराभूत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पण या सगळ्यामध्ये काँग्रेसचा नेमका निवडणुकीत पराभव का झाला काँग्रेसने महाराष्ट्रातल्या महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा करूनही महिलांचा महायुतीच्या 2100 रुपयांवर विश्वास कसा बसला??, काँग्रेसच्या 3000 रुपयांवर विश्वास का बसला नाही??, या संदर्भात मात्र आपण आत्मपरीक्षण करू असे काँग्रेसने अद्याप तरी म्हटल्याचे आढळले नाही.