• Download App
    राहुल गांधींना मानहानी प्रकरणात तात्पुरता दिलासा, चौकीदार चोर है म्हटल्याबद्दल झाला होता खटला दाखल|Rahul Gandhi was given a temporary consolation in the defamation case

    राहुल गांधींना मानहानी प्रकरणात तात्पुरता दिलासा, चौकीदार चोर है म्हटल्याबद्दल झाला होता खटला दाखल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख चौकीदार चोर है असा केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने 20 डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना हा तात्पुरता का होईना, दिलासा मिळाला आहे.Rahul Gandhi was given a temporary consolation in the defamation case

    राहुल गांधी यांच्याविरोधात महेश हुकूमचंद श्रीश्रीमल यांनी मुंबईतील गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार केली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या नावे समन्स जारी झाला होता. त्यांना न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचा आदेश दिला होता.



    त्यावर ही तक्रार रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्या अर्जावर आज सोमवारी न्या. एस. के. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. मानहानीच्या खटल्यात 20 डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गिरगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयाला दिला.

    राहुल गांधी यांनी सप्टेंबर 2018 मध्ये राजस्थानात झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख चौकीदार चोर है असा केला होता. त्यावरून त्यांच्यावर खटला दाखल झाला होता.

    Rahul Gandhi was given a temporary consolation in the defamation case

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!