विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मतदार यादीत छेडछाड झाल्याचा गाजावाजा करत निवडणूक आयोगावर आरोप केले. पण त्यांच्या दाखवलेल्या ‘पुराव्याची’ पडताळणी केल्यानंतर तोच पुरावा खोटा निघाल्याने राहुल गांधींचा ‘व्होट चोरी’ बॉम्ब फुसका ठरला. Rahul Gandhi
काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा ‘व्होट चोरी’च्या आरोळ्या देत निवडणूक आयोगावर धावून गेले. पण यावेळीही त्यांचे दावे सत्यशोधनात खोटे ठरले आहेत. राहुल गांधींनी १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत पॉवरपॉईंट सादरीकरण करत “कर्नाटकमध्ये काँग्रेस मतदारांची नावं संगणकीय पद्धतीने वगळण्यात आली” असा गाजावाजा केला. त्यांनी अलंद मतदारसंघाचे उदाहरण देत सांगितले की ६,०१८ मतदारांचे अर्ज बनावटपणे दाखल झाले आणि काँग्रेस समर्थकांनाच लक्ष्य केले गेले. Rahul Gandhi
सर्वात मोठा ‘पुरावा’ म्हणून त्यांनी बबिता चौधरी या महिलेचे नाव घेतले. “तिचे नाव यादीतून गायब झाले” असा आरोप केला. मात्र काही पत्रकारांनी यांनी राहुल गांधींचे सादरीकरण हाती घेतले आणि थेट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर संशोधन केली. बबिता चौधरी यांचे EPIC क्रमांक टाकताच, त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच राहुल गांधी आणि बबिता चौधरी यांचा दावा सपशेल खोटा ठरला.
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत “१०० टक्के पुरावे आहेत” अशी गर्जना केली. पण प्रत्यक्षात त्यांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटलाच नाही. उलट त्यांच्या सादरीकरणाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर राजकीय चिखल उडवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.
राहुल गांधींच्या “व्होट चोरी”च्या आरोळ्या जोरात असल्या तरी सत्यशोधनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की काँग्रेस नेत्यांचे दावे पुराव्यांपुढे टिकत नाहीत.
Rahul Gandhi ‘vote theft’ bombshell leaked
महत्वाच्या बातम्या
- स्टील महाकुंभात महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षांत ग्रीन स्टील क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणायचा निर्धार, ग्रीन स्टील प्रमाणपत्र वाटप
- राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप दिल्ली विद्यापीठाल्या विद्यार्थ्यांना नाही पटला; बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत NSUI ला दिला दणका!!
- Pakistan Saudi Arabia : पाकिस्तान-सौदीमध्ये महत्त्वाचा संरक्षण करार; पाक किंवा सौदीवर हल्ला म्हणजे दोघांवर हल्ला असेल
- Supreme Court : शीख विवाहांची नोंदणी आनंद विवाह कायद्याअंतर्गत करा; सुप्रीम कोर्टाचे UP बिहारसह 17 राज्यांना आदेश