विशेष प्रतिनिधी
मुंबई : राहुल गांधी परभणीला आले आणि महाराष्ट्रात राजकारण पेरून गेले, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला चढवला. Rahul Gandhi’s visit to violence-hit Parbhani
सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर राहुल गांधी परभणीत आले होते. तिथे त्यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी हा दलित तरुण असल्यानेच त्याची पोलिसांनी हत्या केली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटे वक्तव्य दिले. त्यांनी पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग ठराव आणण्याची घोषणा केली.
मात्र पुण्यातल्या एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला चढावला. राहुल गांधी महाराष्ट्रात फक्त राजकारण करायला आले होते. सरकारने सोमनाथ सूर्यवंशी संशयास्पद मृत्यू प्रकरणात आधीच न्यायालयीन चौकशी सुरू केली आहे. त्या चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर जो दोषी आढळेल, तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करू, असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला.
न्यायालयीन चौकशीचा निष्कर्ष येण्यापूर्वीच राहुल गांधींनी दलित तरुणाच्या हत्येचा निष्कर्ष काढणे यासारखी दुसरी गंभीर गोष्ट नाही. ते लोकसभेतले विरोधी पक्षनेते म्हणजे एका घटनात्मक पदावर आहेत. त्यांनी असे परस्पर गंभीर वक्तव्य करणे चूक आहे, असे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
केवळ निळ्या रंगाचे कपडे घातले म्हणून कोणी काही आंबेडकरवादी होत नाही, असा टोला नारायण राणे यांनी राहुल गांधींना हाणला.
Rahul Gandhi’s visit to violence-hit Parbhani
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
- Bangladeshis : दिल्लीत अवैध बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन
- Pune book festival : वाचन प्रेमींकडून २५ लाख पुस्तकांची खरेदी ; ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल
- Kejriwal दिल्लीची निवडणूक जिंकली तरी केजरीवाल खुर्ची पासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा!!