वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि केरळमधील वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी 12 तुघलक रेडचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले. त्यांचे सामान त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी हलवण्यात आले आहे.Rahul Gandhi vacates government bungalow, shifts to mother Sonia’s house; A notice to vacate the house was received after the MP left
सुमारे 19 वर्षे हा बंगला त्यांचे अधिकृत निवासस्थान होते, परंतु खासदारकीनंतर त्यांना हा बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले होते.
23 मार्च रोजी सुरत कोर्टाने मानहानीच्या एका प्रकरणात त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर अल्पावधीतच त्यांना जामीनही मिळाला. दुसऱ्याच दिवशी राहुल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. 27 मार्च रोजी त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली होती.
नोटीस मिळाल्यानंतर राहुल म्हणाले होते की, सरकारी बंगल्याशी माझ्या अनेक चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना त्यांच्या किंवा सोनियांच्या बंगल्यावर स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला होता.
27 मार्च रोजी लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल यांना 12 तुघलक रोड येथील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस पाठवली होती. बंगला रिकामा करण्यासाठी 24 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल यांनी लोकसभा सचिवालयाचे उपसचिव डॉ. मोहित रंजन यांना लेखी उत्तर पाठवले.
राहुल यांनी आपल्या उत्तरात लिहिले होते की, मी 4 वेळा लोकसभेचा खासदार निवडून आलो. हा जनतेचा जनादेश आहे, त्यासाठी मी जनतेचा आभारी आहे. या घराशी माझ्या अनेक चांगल्या आठवणी जोडलेल्या आहेत. नोटीसमध्ये दिलेल्या आदेशाचे मी पालन करीन. हा बंगला 2005 मध्ये राहुल यांना देण्यात आला होता, जेव्हा ते 2004 मध्ये पहिल्यांदा अमेठीमधून खासदार म्हणून निवडून आले होते.
Rahul Gandhi vacates government bungalow, shifts to mother Sonia’s house; A notice to vacate the house was received after the MP left
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!