राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर आता राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर खात्यावरील परिचायामध्ये ‘अपात्र खासदार’ असा उल्लेख केला आहे. Rahul Gandhi updated his Twitter bio to call himself an Dis qualified MP
राहुल गांधींच्या ट्विटर बायोमध्ये काय लिहिले आहे?
राहुल गाधींच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, ‘हे राहुल गांधींचे अधिकृत खाते आहे. सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.’ यानंतर शेवटी त्यांनी ‘अपात्र खासदार’ असे लिहिले आहे.
संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली होती. ‘’मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे. मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.” असं त्यांनी म्हटलं होतं. तर राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेस व विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदी व भाजपावर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे.
राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात? असे विधान केले होते. यानंतर भाजपपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.
Rahul Gandhi updated his Twitter bio to call himself an Dis qualified MP
महत्वाच्या बातम्या
- सनातन संस्था ही काही दहशतवादी संघटना नाही, आरोपींना जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
- पत्रकाराचा ‘भाजप कार्यकर्ता’ असा उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध
- युक्रेनशी युद्धादरम्यान व्लादिमीर पुतिन यांची मोठी घोषणा- बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करणार रशिया
- Mission Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेश भाजपची नवी टीम जाहीर; १८ उपाध्यक्ष आणि सात सरचिटणीसांच्या नावांची यादी जाहीर