विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 99 जागा मिळाल्यानंतर जोश भरलेल्या काँग्रेस मधून धडाधड निर्णय समोर येत आहेत. राहुल गांधींनी रायबरेली मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा आणि वायनाड मतदार संघ सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता वायनाड मधून राहुल गांधी यांच्या ऐवजी प्रियांका गांधी खासदार होणार आहेत. Rahul Gandhi to keep Raebareli seat, Priyanka Gandhi to contest elections from Wayanad
राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातूनच खासदार राहणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी ही माहिती दिली. प्रियांका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी वायनाडमधून राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी लोकसभा सचिवालयाकडून कलम 240 (1) अंतर्गत राजीनामा देण्याच्या प्रक्रियेबाबत माहिती मागवली होती.
राहुल गांधी यांच्या राजीनाम्यापूर्वीच ते यूपीला प्राधान्य देतील, अशी अपेक्षा होती. रायबरेली हे त्यांच्या कुटुंबाचे पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. या जागेवरून सोनिया गांधी आणि इंदिरा गांधीही खासदार झाल्या आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधून सीपीआयच्या एनी राजा यांचा 3 लाख 64 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रायबरेलीमधूनही ते साडेतीन लाख मतांनी विजयी झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. पण वायनाडमध्ये 4.31 मतांनी विजयी झाला होता.
2019 च्या निवडणुकीत त्यांनी पीपी सनीर यांचा पराभव केला. 2009 मध्येही वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे एमआय शाहनवाज विजयी झाले होते. आता या जागेवर प्रियांका गांधी पोटनिवडणूक लढवणार आहेत. रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा विजय हा यूपीमध्ये काँग्रेसचे पुनरागमन मानला जात आहे. या निवडणुकीत काँग्रेसने रायबरेली, अमेठी, सीतापूर, सहारनपूर, अलाहाबाद आणि बाराबंकीसह उत्तर प्रदेशातील 6 जागा जिंकल्या. अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार किशोरी लाल यांचा 167196 मतांनी पराभव झाला. रायबरेली आणि अमेठी या गांधींच्या कौटुंबिक वर्चस्वाच्या जागा आहेत.
Rahul Gandhi to keep Raebareli seat, Priyanka Gandhi to contest elections from Wayanad
महत्वाच्या बातम्या
- टीकेची झोड उठली तरी अजितदादांना सोडवेना सत्तेची वळचण; पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही अजितदादांची पाठराखण!!
- POCSO प्रकरणात येडियुरप्पा यांच्या अटकेला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली स्थगिती!
- रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही
- काश्मीरच्या आजादीची वकिली केल्याबद्दल अर्बन नक्षल अरुंधती रॉय वर UAPA अंतर्गत खटला चालणार!!