• Download App
    Vote chori : राहुल गांधींचा "हायड्रोजन बॉम्ब" आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!! Rahul Gandhi

    Vote chori : राहुल गांधींचा “हायड्रोजन बॉम्ब” आला; पण कोर्टाची पायरी चढायला घाबरला!!

    नाशिक‌ : राहुल गांधींचा Vote chori चा “हायड्रोजन बॉम्ब” आला, पण कोर्टात जायला घाबरला!!, असं म्हणायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे आली. काँग्रेसचे नवे मुख्यालय इंदिरा भवन मध्ये घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या आळंद मतदार संघाचे उदाहरण घेऊन तिथली 6018 मते डिलीट झाल्याचे सांगितले. त्यांचे स्वतःच्या मते असणारे पुरावे प्रेझेंटेशन द्वारे पत्रकारांसमोर मांडले. ज्यांची नावे डिलीट झाली आणि ज्यांच्या नावाने फॉर्म भरले गेले, त्या दोन व्यक्तींना गोदाबाई आणि सूर्यकांत यांना पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी समोर आणले. प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर नाव घेऊन थेट आरोप केले, पण हायड्रोजन बॉम्ब सारखे पुरावे पत्रकार परिषदेत दाखविणाऱ्या राहुल गांधींनी शेवटपर्यंत आपण कोर्टाची पायरी चढू, असा शब्द दिला नाही. Rahul Gandhi

    राहुल गांधींनी काहीच दिवसांपूर्वी कर्नाटक मधल्या महादेव पुरा मधल्या मतदान चोरी झाल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधीचे प्रेझेंटेशन करून त्यांच्या मते असलेले पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. मात्र त्यावेळी देखील राहुल गांधी कोर्टात गेले नव्हते. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या सगळ्या मुद्द्यांना कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरे दिली होती. राहुल गांधींनी ही सगळी माहिती निवडणूक आयोगामध्ये येऊन आमच्यासमोर द्यावी, असे आव्हान ज्ञानेश्वर यांनी राहुल गांधींना दिले होते. परंतु राहुल गांधींनी ते आव्हान स्वीकारून ते निवडणूक आयोगात गेले नव्हते. परंतु राहुल गांधींनी मत चोरीचे आरोप करणे थांबविले नव्हते. तेव्हा देखील ते कोर्टाची पायरी चढले नव्हते.



    – राहुल गांधींचा आजचा हायड्रोजन बॉम्ब

    आजच्या पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असे सांगून राहुल गांधींनी कर्नाटक मधल्या आळंद मतदार संघाचे उदाहरण दिले. तिथली 6018 मते डिलीट झाले असे सांगितले. वेगवेगळ्या राज्यांमधून विशिष्ट IP addresses वरून 36 सेकंदांमध्ये फॉर्म भरले गेले. त्यानंतर काँग्रेसचे बूथ मजबूत असणाऱ्या केंद्रावरचीच मते डिलीट केली गेली. त्याच्यामध्ये एक सिस्टीम होती. ही चोरी पकडली गेल्यानंतर कर्नाटक सीआयडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना 18 वेळा पत्रे लिहिली. त्यात सीआयडीने त्यांच्याकडे मतदारांची नावे डिलीट करणाऱ्यांचे IP addresses आणि OTP trails मागितले. परंतु मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अद्याप कर्नाटक सीआयडीला पत्रांची उत्तरे दिली नाहीत. किंवा सीआयडीने मागितलेली माहितीही दिलेली नाही. म्हणून मी ज्ञानेश कुमार यांचे नाव घेऊन ते मतं चोरांना मदत करत असल्याचा आरोप करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

    – कोर्टाची पायरी चढण्याचा शब्द नाही

    राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन नंतर प्रश्नोत्तरे झाली त्यावेळी Ani आणि IANS वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुमच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही कोर्टात जाणार का??, असा सवाल केला. त्यावर राहुल गांधींनी हातामध्ये लाल राज्यघटना घेऊन मोठे भाषण केले. देशाची लोकशाही वाचविण्याचे काम देशातल्या संस्थांचे आहे देशातल्या विरोधी पक्षनेत्याचे नाही तरी मी ते काम करतो आहे. मी देशातल्या जनतेपुढे आणि देशातल्या युवकांपुढे सत्य मांडण्याचे काम करतो आहे‌. देशातल्या जनतेने पुढचा निर्णय घ्यायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले. त्या पलीकडे जाऊन राहुल गांधींनी मोठा गौप्यस्फोट केला. आमच्यापर्यंत निवडणूक आयोगातूनच मतचोरीची माहिती समोर येत आहे. आधी निवडणूक आयोगामधून अशी माहिती आमच्यापर्यंत येत नव्हती. परंतु, आता मात्र निवडणूक आयोगामधूनच आम्हाला मतचोरीची माहिती मिळते आहे, असा गौप्यस्फोट राहुल गांधींनी केला. मात्र मतचोरीच्या विरोधात हातात पुरावे असताना आपण कोर्टाची पायरी चढू, हा शब्द राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत दिला नाही‌.

    Rahul Gandhi targets vote chori, but avoid to go to court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मतदार यादीतील नावे ऑनलाईन डिलीट होत नाहीत; राहुल गांधींचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले!!

    EVM : EVMवर आता उमेदवारांचे रंगीत छायाचित्र असेल; मतदारांना सहज वाचता यावे म्हणून नावे मोठ्या अक्षरात असतील

    Election Commission : ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता उमेदवारांचे फोटो रंगीत होणार