नाशिक : एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करायची आणि दुसरीकडे हिंदू शब्दाची नवी व्याख्या करणारे लेखन करायचे, असे दुहेरी राजकारण साधण्याचा प्रयत्न काँग्रेसचे खासदार राहुल गांधी करीत आहेत. Rahul Gandhi succumbed to pressure of political hindutva, writes an article on definition of “hindu”!!
देशात राजकीय हिंदुत्वाचा झपाटा आवरता आवरत नाही, कितीही प्रयत्न केले, तरी मोदी प्रभावीत भाजपचा पराभव करता येत नाही, त्यामुळे मूळावरच घाव घालायचा म्हणून राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी सावरकरांची बदनामी केली. पण त्याचा राजकीय फटका बसताच ती बदनामी आवरती घ्यावी लागली. पण तरीही न्यायालयीन लढावी लढावीच लागणार आहे. कारण राहुल गांधींना लखनऊ जिल्हा न्यायालयाने सावरकरांच्या बदनामी संदर्भात 1 नोव्हेंबरच्या सुनावणीची नोटीस पाठवली आहे.
दरम्यान त्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी राहुल गांधींनी हिंदुत्व आणि हिंदू यात भेद करून झाले. निवडणुकीच्या काळात टेम्पल रन केले, पण परिणाम शून्य!! म्हणून मग आता राहुल गांधींनी हिंदू या शब्दाची नवी व्याख्या करणारा लेख इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहिला आहे. हिंदू म्हणजे सहिष्णुता, हिंदू म्हणजे दुसऱ्याचे मन जाणून घेण्याची कला, हिंदू म्हणजे सर्वव्यापकता, हिंदू कोणालाही द्वेष करायला शिकवत नाही, कोणाचाही द्वेष करतही नाही, अशी वेगवेगळी विधाने राहुल गांधींनी इंडियन एक्सप्रेसच्या त्या दोन पानी लेखात केली आहे.
मूळात राहुल गांधींनी हिंदू या शब्दावर लेख लिहिणे हेच काँग्रेसचे हिंदुत्वापुढे लोटांगण घालण्यासारखेच आहे. कारण आत्तापर्यंत काँग्रेस नेत्यांनी सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता वगैरे विषयांवर बौद्धिक लेख लिहिले. पी. चिदंबरम यांनी गेल्या वर्षभरात इंडियन एक्सप्रेस मध्येच लेखमाला चालविली. त्यात प्रामुख्याने हिंदुत्ववाद्यांचे राजकारण यशस्वी झाल्यापासून देशातल्या सहिष्णुतेचा घात झाला, हाच विषय सर्वाधिक वेळा लिहिला.
पण आता हिंदुत्ववादी राजकारण मागे खेचताच येत नाही, मग निदान त्यातला एक विशिष्ट भाग तरी आपल्याकडे ओढून घेता येतो का??, हे पाहण्यासाठीच राहुल गांधी आता हिंदू या विषयावर लिहायला लागले आहेत. जो “हिंदू” शब्द काँग्रेससाठी गेली 70 वर्षे राजकीयदृष्ट्या अस्पृश्य होता, तो “हिंदू” शब्द आता अचानक राहुल गांधींना प्रिय वाटायला लागून त्यांनी त्याची नवी व्याख्या करणारा लेख लिहिला आहे.
गेल्या वर्ष – दीड वर्षात त्यांनी हिंदुत्व आणि हिंदू यात भेदभाव करणारी भाषणे केलीच आहेत, पण त्यात पुरेशी वैचारिक डुब नसल्याने त्यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये “वैचारिक उंची आणि खोली” असलेला हिंदू म्हणजे काय??, या विषयावर लेख लिहिला आहे. त्यावर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. पण ज्या नेहरू – गांधी प्रणित काँग्रेसने ज्या “हिंदू” शब्दाला कधीच स्वीकारले नाही, तो शब्द स्वीकारावा लागून त्याला आपल्या ढाच्यात बसवण्याचा प्रयत्न राहुल गांधींना करावा लागणे, यातच हिंदुत्वाच्या राजकारणाच्या यशस्वीतेचे सार सामावले आहे!!
Rahul Gandhi succumbed to pressure of political hindutva, writes an article on definition of “hindu”!!
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांच्या मुद्द्यांचे जुने टेक्श्चर; 2023 – 24 मध्ये जनतेला पाजणार 1971 आणि 1989 – 90 चे फॅमिली मिक्श्चर!!
- नाशिक मध्ये आज गोदाप्रेमींचे एकत्रीकरण आणि सन्मान सोहळा; रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा उपक्रम
- Asian Games 2023 : हॉकीमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक अन् दणदणीत विजय
- ”आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल”