• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या merit च्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender - Surrender च्या टोप्या!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या merit च्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!!

    नाशिक : राहुल गांधींनी हरियाणात जाऊन मारल्या मेरीच्या बाता; पण उथळ काँग्रेसने शेअर केल्या Narender – Surrender च्या टोप्या!! असे एकाच दिवशी घडले.

    राहुल गांधींनी काँग्रेसच्या संघटन पर्वाच्या निमित्ताने मध्य प्रदेशचा दौरा केला. तिथे त्यांनी Narender – Surrender या शब्दांचा राजकीय खेळ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे शरणागती पत्करली, असा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपाला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी उचलून धरले, पण अमेरिकेत शशी थरूर यांनी काँग्रेसला आणि राहुल गांधीना ठोकून काढले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या चर्चेत आम्हाला कुणाची मध्यस्थी नकोय. कारण आम्ही एकमेकांची भाषा चांगली समजतो. पाकिस्तानला ज्या भाषेत उत्तर द्यायचे, ती भाषा भारताला चांगली अवगत आहे. त्यासाठी भारताला इतर कुणी शिकवायची गरज नाही, असे शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता सुनावले.



    शशी थरूर अमेरिकेला हे सुनावत असतानाच काल राहुल गांधींनी हरियाणाचा दौरा केला. याच हरियाणामध्ये पाचच महिन्यांपूर्वी काँग्रेस जिंकता जिंकता हरली होती. तिथे भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी स्वतःची मनमानी करत तिकीट वाटप केले आणि काँग्रेसने जिंकत आणलेल्या डाव ते हरून बसले. त्यावेळी राहुल गांधींनी हरियाणाचा कुठे दौरा केला नाही. किंवा भूपेंद्रसिंग हुड्डा यांना पक्ष संघटनेतून दूर केले नाही. हरियाणात पराभव झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांना भेटायला गेले नाहीत. पराभवाला पाच-सहा महिने उलटून गेल्यानंतर राहुल गांधींनी हरियाणाचा दौरा केला.

    या दौऱ्यात त्यांनी merit च्या बाता मारल्या. काँग्रेस संघटनेत गुणवत्तेवर आधारित काम करा कारण. इथून पुढे merit चे काम करणाऱ्यांनाच काँग्रेस संघटनेत स्थान मिळेल. मोठ्या नेत्यांच्या पुढेमागे करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजिबात स्थान मिळणार नाही, असे त्यांनी भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्या सकट सगळ्या नेत्यांना सुनावले. हरियाणातल्या तिकीट वाटपाच्या वेळी राहुल गांधींना “गुणवत्ता” आठवले नव्हती. ती विजयाचे रूपांतर पराभव झाल्यानंतर पाच महिन्यांनी आठवली.

    पण ज्या दिवशी राहुल गांधींना “गुणवत्ता” आठवली, त्याच दिवशी काँग्रेसने त्या गुणवत्तेच्या बैलाला घो लावला. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून उथळपणे Narender – Surrender शाब्दिक खेळ करणारा “उद्योग” केला. डोनाल्ड ट्रम्प नेहमी वापरतात, ती टोपी सोशल मीडिया हँडलवर शेअर केली. त्या टोपीवर Narender – Surrender असे लिहिले. जी शरणागती घडलीच नाही, ती दाखवायचा केविलवाणा डाव खेळला.

    Rahul Gandhi spoke of merit, but Congress acted demerit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Becomes Ukraine : भारत युक्रेनचा सर्वात मोठा डिझेल पुरवठादार बनला; जुलैमध्ये दररोज 2,700 टन डिझेल विकले

    Kiren Rijiju : राहुल यांचे नाव न घेता रिजिजू म्हणाले- त्यांना चर्चा नकोय; हा फक्त पॉलिटिकल ड्रामा

    US Tariffs : अमेरिकेच्या आयात शुल्कांमुळे पंजाबला 30,000 कोटी रुपयांचे नुकसान; कापड निर्यातीत 8,000 कोटींचा फटका