• Download App
    Rahul Gandhi कोल्हापुरात राहुल गांधींचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानावर व्याख्यान

    Rahul Gandhi : कोल्हापुरात राहुल गांधींचे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधानावर व्याख्यान; पण दिल्लीतल्या काँग्रेसच्या ड्रग्स प्रकरणावर मौन!!

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधान या विषयावर मोठे व्याख्यान दिले, पण दिल्लीमध्ये काँग्रेसचाच नेता तब्बल 5600 कोटींच्या ड्रग्स प्रकरणाचा मास्टर माईंड निपजला, त्याविषयी मात्र मौन धारण केले. Rahul Gandhi speech in kolhapur on chhatrapati shivaji maharaj

    राहुल गांधी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा आले. 15 दिवसांपूर्वी पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ते सांगलीत आले होते. आज ते कोल्हापूरमध्ये कसबा बावड्यात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने आले. त्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारातून संविधानाची निर्मिती झाली, असे व्याख्यान दिले. महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसता पुतळा उभा केला. परंतु त्यांची नियत साफ नव्हती म्हणून पुतळा कोसळला, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा चालवायचा असेल, तर तुम्हाला संविधानाचे रक्षण करावे लागेल, असे त्यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले. Rahul Gandhi


    Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार, 15-16 ऑक्टोबरला SCO बैठकीत सहभागी होणार


    ज्या विचार प्रणालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, तीच विचार प्रणाली आज सत्तेवर आहे. संविधानाच्या आधारे आपल्याला तिच्याशी लढायचे आहे, असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. Rahul Gandhi

    पण दिल्लीतल्या तब्बल 5600 कोटींच्या ड्रग्स प्रकरणावर मात्र राहुल गांधींनी मौन धारण केले. त्याविषयी त्यांनी कुठल्याही वक्तव्य केले नाही. प्रत्यक्षात दिल्लीतल्या ड्रग्स घोटाळ्यात काँग्रेसचा आरटीआय सेलचा दिल्लीचा प्रमुख तुषार गोयल मास्टर माईंड निघाला. त्याच्यासह 12 जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले. वीरेंद्र बसोया हा व्यापारी दुबईत बसून तुषार गोयल आणि त्याच्या साथीदारांसह दिल्लीत कोकेन आणि अन्य अंमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता. त्याचे धागेदोरे पोलिसांनी उघडले आहेत. या ड्रग्स घोटाळ्यातला पैसा काँग्रेसने निवडणूक प्रचारात वापरल्याचा संशय पोलिसांना आहे त्याविषयी पोलीस कसून तपास करत आहे. Rahul Gandhi

    दिल्लीत तब्बल 5600 कोटींचे ड्रग्स पकडले आणि त्यामध्ये काँग्रेसचा तिथला नेता मास्टर माईंड निपजला या विषयावर मात्र राहुल गांधींनी तोंड उघडले नाही. त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी संविधान या विषयावर व्याख्यान देणे पसंत केले. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची मोठी मांदियाळी उपस्थित होती. परंतु, त्यांनी देखील ड्रग्स प्रकरणावर आपले तोंड उघडले नाही.

    Rahul Gandhi speech in kolhapur on chhatrapati shivaji maharaj

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    DK Shivakumar : डीके शिवकुमार म्हणाले- गांधी परिवार माझा देव, मी त्यांचा भक्त] शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसी राहणार

    mohan bhagwat : सरसंघचालक म्हणाले- प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर व्हावा; हिंदू राष्ट्राचा सत्तेशी संबंध नाही, 40 हजार वर्षांपासून अखंड भारताचा DNA एक

    Mohan Bhagwat : अखंड भारतात राहणाऱ्या लोकांचा डीएनए सारखाच, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत