• Download App
    Rahul Gandhi राहुल गांधींनी सांगितली आजकालची "राजकीय फॅशन"; खासदार शांभवी चौधरींनी काढले त्यांचे वाभाडे!!

    राहुल गांधींनी सांगितली आजकालची “राजकीय फॅशन”; खासदार शांभवी चौधरींनी काढले त्यांचे वाभाडे!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहारची राजधानी पाटणामध्ये जाऊन आजकालची “राजकीय फॅशन” सांगितली त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले. आजकाल प्रत्येक पक्ष दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांना लोकप्रतिनिधीत्व देतो. ती राजकीय फॅशन बनली आहे, पण सगळे अधिकार मात्र पंतप्रधान मोदी स्वतःकडेच खेचून घेतात. त्यांच्या आमदार – खासदारांना निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. मोदी प्रत्येक समाजातला मंत्री बनवतात, परंतु त्यांचा ओएसडी मात्र संघातूनच आणतात. त्यामुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांना लोकप्रतिनिधित्व मिळाले, तरी अधिकार मिळत नाहीत असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले.

    बिहार मधले पहिले दलित मंत्री जगलाल चौधरी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी बोलत होते.

    – शांभवी चौधरींचे उत्तर

    मात्र राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला लोक जनशक्ती पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिले. राहुल गांधी ज्या जगलाल चौधरी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात पोहोचले होते, त्या जगलाल चौधरींचे नाव देखील त्यांना नीट घेता आले नाही. ते “जगलाल” चौधरी यांच्या ऐवजी “जगत” चौधरी असे म्हणत होते. याचा अर्थ त्यांना जगलाल चौधरी यांच्या विषयी काही माहितीच नव्हती आणि ते दलितांच्या प्रतिनिधित्वाबद्दल कळवळा आणून बोलत होते.

    पंतप्रधान मोदींनी कालच दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कशा आणि किती संधी उपलब्ध केल्यात याची माहिती दिली होती. मेडिकल, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दलित विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या वेगवेगळ्या पदांवर दलित, आदिवासी समाजातले युवक पोहोचले. ते सगळ्या समाजासाठी आपले योगदान देत आहेत. समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत आहेत. सरकारी आणि खाजगी पातळीवर त्याची दखल घेऊन संपूर्ण सामाजिक उत्थान होत आहे, पण हे राहुल गांधींना दिसत नाही किंवा दिसत असून देखील त्यांना त्याबद्दल बोलायचे नाही, किंवा त्यांनी बोलू नये, असा त्यांचे सल्लागार त्यांना सल्ला देत असावेत, असा टोला खासदार शांभवी चौधरी यांनी हाणला.

    Rahul Gandhi says, “In India’s power structure today, whether it is education, health, corporate, business, judiciary, how much is your participation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट