• Download App
    राहुल गांधी म्हणाले, मला यूपीचे आंबे आवडत नाहीत, मुख्यमंत्री योगींनी दिले प्रत्युत्तर, तुमची टेस्टच फूट पाडणारी आहे Rahul Gandhi said, "I don't like mangoes from Uttar Pradesh, but the response of Chief Minister Yogi is that your taste is divisive;  Read detailed

    राहुल गांधी म्हणाले, मला यूपीचे आंबे आवडत नाहीत, मुख्यमंत्री योगींनी दिले प्रत्युत्तर, तुमची टेस्टच फूट पाडणारी आहे

    कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पत्रकारांनी आंब्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आपल्याला उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही. आंध्र प्रदेशचा आवडतो. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. Rahul Gandhi said, “I don’t like mangoes from Uttar Pradesh, but the response of Chief Minister Yogi is that your taste is divisive;  Read detailed


    विशेष प्रतिनिधी 

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पेगासस विषयावर पत्रकार परिषदेत खासदार राहुल गांधींनी आंबा विषयी केलेल्या वक्तव्याचा पलटवार केला आहे.  यूपीचे सीएम योगी यांनी राहुल गांधींचा आंबा विषयाच्या संबंधित व्हिडिओ ट्विट करुन लिहिले आहे की तुमची वृत्ती विभाजक आहे. अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

    कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पत्रकारांनी आंब्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आपल्याला उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही. आंध्र प्रदेशचा आवडतो. यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते.

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत ट्विट केले की, “श्री राहुल गांधी जी, तुमची ‘टेस्ट’ फूट पाडणारी आहे.  आपल्या विभाजन संस्कारांबद्दल संपूर्ण देश जागरूक आहे.आपल्यावर विघटनकारी गैरप्रकारांचा प्रभाव इतका प्रभावशाली आहे की आपण फळांची चव प्रादेशिकतेच्या अग्नीत फेकली आहे.  पण हे लक्षात ठेवा की काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा भारताचा ‘स्वाद’ एक आहे.

    सीएम योगी यांच्या आधी गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनीही राहुल गांधींच्या आंबा वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती.  रवी किशन यांनी लिहिले होते, “राहुलजींना उत्तर प्रदेशचा आंबा आवडत नाही आणि उत्तर प्रदेशच्या जनतेला देखील काँग्रेस आवडत नाही.  त्यामुळं हिसाब बरोबर आहे.

    “पुढच्या वर्षी यूपीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.  यासाठी स्वत: प्रियंका गांधी यांनी कॉंग्रेसच्या वतीने ही कमांड घेतली आहे.  नुकतीच त्यांनी लखनऊलाही भेट दिली होती, ज्यात त्यांनी योगी सरकारवर शाब्दिक आक्रमण केले होते.

    Rahul Gandhi said, “I don’t like mangoes from Uttar Pradesh, but the response of Chief Minister Yogi is that your taste is divisive;  Read detailed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!