विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi : राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन सांगितले, भारतात सगळे काही “चायना मेड”!! म्हणून भारतात रोजगाराची समस्या आहे आणि चीनमध्ये रोजगाराची समस्या नाही. पण हे वक्तव्य करून राहुल गांधींनी नेमकी टीका तरी कोणावर केली??, असा सवाल तयार झाला. Rahul Gandhi Said From Texas America
राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यात टेक्सास मध्ये भारतीयांसमोर त्यांची प्रश्न उत्तरे झाले यामध्ये राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेपासून वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. बोलण्याच्या ओघात राहुल गांधी म्हणाले, भारतात सगळ्याच वस्तू “चायना मेड” आहेत. भारतात उत्पादनाची स्थिती चांगली नाही. सध्या उत्पादनाची कंत्राटे निवडक एक दोनच उद्योगपतींना दिली जातात. त्यामुळे भारतात रोजगाराची समस्या आहे. भारत सगळ्या चायना मेड वस्तू आयात करत असल्यामुळे चीनमध्ये रोजगाराची समस्या नाही. Rahul Gandhi
अमेरिकेत जाऊन राहुल गांधींनी वरील वक्तव्य केल्यामुळे ते नेमके टीका तरी कोणावर करत आहेत??, असा सवाल तयार झाला. सकृतदर्शनी राहुल गांधींना मोदी सरकारवर टीका करायची आहे, हे दिसले. कारण त्यांनी निवडक एक दोनच उद्योगपतींना कंत्राटे दिले जातात, असा उल्लेख केला. परंतु त्या पलीकडे जाऊन ज्या “चायना मेड” वस्तूंचा उल्लेख राहुल गांधींनी केला त्या “चायना मेड” वस्तूंचे डम्पिंग नेमके भारतात केव्हा सुरू झाले??, याचा थोडा धांडोळा घेतला, तर 2010 च्या दशकामध्ये ज्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार अस्तित्वात होते, त्यावेळी हे डम्पिंग सुरू झाले, असे दिसून आले. त्या काळात भारतात “चायना मेड” वस्तूंची भरमार झाली. त्यावेळी भारतात जरी मनमोहन सिंग यांच्यासारखे अर्थतज्ञ पंतप्रधान असले, तरी प्रत्यक्षात सरकारची सूत्रे सोनिया गांधींच्या हाती होती. सर्व धोरणांवर सोनिया गांधींचा प्रभाव होता. त्यावेळी भारताचे आर्थिक धोरण “चायना मेड” वस्तूंच्या आयातीसाठी सर्वाधिक अनुकूल ठरले होते, असा निर्वाळा अनेक तज्ञांनी दिला.
त्यामुळे भारतातल्या बेरोजगारीच्या समस्येसाठी राहुल गांधींनी जरी “चायना मेड” वस्तूंना जबाबदार धरून मोदी सरकारला ठोकण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्षात त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात भारतात “चायना मेड” वस्तूंचे डंपिंग सुरू झाल्याची वस्तुस्थिती समोर आली.
आज भारतात “मेक इन इंडिया”चा बोलबाला आहे. या धोरणातून जागतिक पातळीवरील वस्तूंचे उत्पादन भारतात व्हावे, असा मोदी सरकारचा इरादा आहे. जागतिक राजकारणातले आणि अर्थकारणातले ताणेबाणे भारतातल्या विरोधकांची अडथळे यातून मेक इन इंडिया सारख्या धोरणावर मोदी सरकारला मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे हे धोरण कासव गतीने पुढे सरकताना दिसते. Rahul Gandhi
Rahul Gandhi Said From Texas America
महत्वाच्या बातम्या
- Congress : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अन् ‘आप’चं अखेर जुळलं!
- Manoj jarange + Sambhji Raje : जरांगे + संभाजीराजे : चर्चा तिसऱ्या आघाडीची; पण निवडणुकीनंतरच्या समीकरणात सत्ता भरती कुणाची??
- Sharad Pawar : गुरुने दिला छुपा हा वसा; जरांगेंच्या तोंडी फक्त पाडण्याची भाषा!!
- Dalpati Vijay : दलपती विजय तमिळनाडूत 2026च्या निवडणुकीच्या लढाईत उतरण्यास तयार