• Download App
    Rahul Gandhi praised Chinese drones राहुल गांधींनी केली होती चिनी

    राहुल गांधींनी केली होती चिनी ड्रोनची भलामण; पण आता त्यांनी drone warfare चा इशारा दिल्याचे काँग्रेसचे सादरीकरण!!

    Rahul Gandhi

    नाशिक : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ सादर करून चिनी ड्रोन तंत्रज्ञानाची भलामण केली होती, पण आता त्याच व्हिडिओतले काही अंश सादर करून राहुल गांधींनी drone warfare चा किती गंभीर इशारा दिला, होता, अशा स्वरूपाचे सादरीकरण काँग्रेसने आज केले.Rahul Gandhi praised Chinese drones

    साधारण दोन महिन्यांपूर्वी राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले होते. त्यामध्ये त्यांनी ड्रोन टेक्नॉलॉजी आणि तिचा वेगवेगळा वापर याविषयी काही मते मांडली होती. Drone technology मध्ये चीन भारतापेक्षा कितीतरी पुढे आहे. भारतात ड्रोन बनवले जातात, पण त्यांच्यातले components चिनी बनावटीचे असतात. चीन मात्र स्वतःच्याच आधुनिक तंत्रज्ञानातून विकसित झालेले components आपल्या ड्रोन मध्ये वापरतो. त्यामुळे ते जास्त आधुनिक आणि बहुउपयोगी ठरतात. चिनी ड्रोन तंत्रज्ञान भारतीय ड्रोन तंत्रज्ञानापेक्षा अव्वल आहे, असे दावे त्यावेळी राहुल गांधींनी केले होते.



     

     चिनी माल ठरला फुसका

    मात्र operation sindoor दरम्यान चिनी तंत्रज्ञानाचा सगळा पर्दाफाश झाला. चीनने पाकिस्तानला विकलेले ड्रोन आणि विमाने त्याचबरोबर मिसाईल्स किती फुसके आहेत, हे भारताने operation sindoor मधून चार दिवसांमध्ये सिद्ध केले. राहुल गांधींनी त्याविषयी कोणतेही भाष्य केले नाही.

    पण कालच युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ले करून रशियाची 40 विमाने नष्ट केली. पाच विमानतळांचे नुकसान केले. त्याबरोबर काँग्रेसने उचल खाल्ली. राहुल गांधींनी drone warfare विषयी पूर्वीच इशारा देऊन ठेवला होता, अशा स्वरूपाचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला. त्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींच्या आधीच्या व्हिडिओचे तुकडे वापरले, जे प्रत्यक्षात चिनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या भलामणीसाठी राहुल गांधींनी केले होते.

    राहुल गांधी किती द्रष्टे त्यांनी नेते आहेत, त्यांनी मोदी सरकारला दिलेले प्रत्येक इशारे काळाच्या कसोटीवर कसे खरे उतरले वगैरे डिंग्या काँग्रेसने यात मारल्या. त्यात त्यांनी नोटबंदीचा विषय आणि कोरोनाचा विषय देखील घुसवून टाकला. मोदी सरकारने नोटबंदी केली, त्यावेळी हा छोट्या उद्योगांवर हल्ला आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. कोरोनाची सुनामी येते आहे. देशाला वाचविले पाहिजे, असे राहुल गांधींनी सांगितले होते, असे एका चढ एक दावे काँग्रेसने त्या व्हिडिओत केले.

    पण ऑपरेशन सिंदूर दरम्यान चिनी तंत्रज्ञानाची पोल खुलली. चिनी विमाने, मिसाईल्स आणि ड्रोन्स फुसके ठरले. भारताने चार दिवसात चिनी तंत्रज्ञानाच्या चिंध्या केल्या. याविषयी मात्र राहुल गांधी आणि काँग्रेसने तोंड उघडले नाही किंवा कुठले व्हिडिओ पण शेअर केले नाहीत.

    Rahul Gandhi praised Chinese drones, but Congress claimed he warned drone warfare

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitish Kumar : नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी, आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

    SC OBC Reservation : OBC आरक्षण सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला सूचना- उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा!

    Mahua Moitra : बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांच्या अटकेचा जुना फोटो शेअर; महुआ मोईत्रा यांची पोकळ धमकी