• Download App
    Rahul Gandhi इकडे राहुल गांधींचे "री री री री री लॉन्चिंग" नीट होई ना, चालले बिहारमध्ये कन्हैया कुमारचे "लॉन्चिंग" करायला!!

    Rahul Gandhi : इकडे राहुल गांधींचे “री री री री री लॉन्चिंग” नीट होई ना, चालले बिहारमध्ये कन्हैया कुमारचे “लॉन्चिंग” करायला!!

    इकडे राहुल गांधींचे “री री री री री लॉन्चिंग” नीट होई ना, चालले बिहारमध्ये कन्हैया कुमारचे “लॉन्चिंग” करायला!! अशी अवस्था खरंच काँग्रेसची अहमदाबाद मधल्या महत्त्वाकांक्षी अधिवेशन नंतरही झाली आहे. शीर्षकात पाच वेळा “री” लिहिलेय ते खरेच आहे. कारण काँग्रेसने त्यापेक्षा जास्त वेळा राहुल गांधींचे Rahul Gandhi लॉन्चिंग करायचा प्रयत्न केला, पण ते फेल गेले

    त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य गुजरातमधल्या अहमदाबाद मध्ये काँग्रेसचे अधिवेशन कुठेतरी दमदार होईल, त्यातून काँग्रेस संघटनेसाठी कुठलीतरी संजीवनी मिळेल, काँग्रेसची विरोधी पक्ष म्हणून देशात दमदार वाटचाल सुरू होईल आणि त्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने राहुल गांधींचे पुन्हा एकदा दमदार “री लॉन्चिंग” होईल, असे वाटले होते. किंबहुना काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तशी अपेक्षा ठेवली होती, पण प्रत्यक्षात दोन दिवसांच्या अहमदाबाद अधिवेशनामध्ये हाती तर फारसे काही लागलेच नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारशी लढायचे कसे??, या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे उघड झाले.

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ले करणारी भाषणे केली. 2024 पूर्वीचाच जातनिहाय जनगणनेचा अजेंडा पुढे रेटला. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांची waqf सुधारणा कायद्यावर मते एकच असल्याचे या दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणांमधून दाखवून दिले. राहुल गांधींनी संविधानाचे लाल पुस्तक हातात घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर बाता मारल्या. पण त्यापलीकडे या दोन्ही नेत्यांच्या भाषणांमध्ये नवे मुद्दे फारसे नव्हतेच. मात्र संघटनात्मक पातळीवर काँग्रेस आता जिल्हा युनिटला ताकद देईल. त्यांची जबाबदारी वाढतेल. निवडणुकांमधल्या तिकीट वाटपात जिल्हा युनिटला आणि जिल्हा अध्यक्षांना सहभागी करून घेईल एवढाच फक्त नवा मुद्दा मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भाषणात होता.

    त्या उलट काँग्रेसमध्ये शॅडो अध्यक्ष शशी थरूर यांनी काँग्रेसला देशवासीयांकडे पर्यायी व्हिजन मांडण्याचा प्रस्ताव दिला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकेचा हल्ला करण्यापेक्षा काँग्रेस सध्याच्या सत्तारूढ भाजप पेक्षा अधिक चांगला पक्ष आहे, तो सर्वसमावेशक पक्ष आहे, देशातल्या सर्व राजकीय सामाजिक आणि आर्थिक प्रवाहांना सामावून घेऊन काँग्रेस वाटचाल करू इच्छिते असे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देशावासीयांना पटवून द्यावे. काँग्रेस संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करून ती अंमलात आणावी, अशा सूचना शशी थरूर यांनी केल्या. पण या सूचनांकडे काँग्रेस कार्यकारिणीने फारसे गांभीर्याने पाहिल्याचे चित्र दिसले नाही.

    एकीकडे काँग्रेसचे अहमदाबाद अधिवेशन राहुल गांधींचे री लॉन्चिंग करण्यामध्ये असे अयशस्वी ठरले असताना दुसरीकडे काँग्रेसने बिहारमध्ये कन्हैया कुमारचे लॉन्चिंग करायचा प्रयत्न चालवलाय. याचे सुरुवातीचे चित्र बेगूसरामध्ये दिसलीस होते तिथे बेरोजगार युवकांच्या आंदोलनाच्या निमित्ताने राहुल गांधींनी काँग्रेस मधल्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून कन्हैया कुमारला आपल्या हाताशी धरले होते बेगूसरायच्या रस्त्यावर ते कन्हैया कुमार याच्या हातात हात घालूनच फिरले होते त्याचवेळी कन्हैया कुमारचे बिहारमध्ये लॉन्चिंग होणार असे चित्र दिसत होते.

    वास्तविक काँग्रेसने बिहारमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल करून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तिथे राजेश कुमार या दलित नेत्याला नेमले. त्यातून राहुल गांधींनी बिहारमध्ये सामाजिक न्यायाचा प्रवाह सुरू केल्याचे राजेश कुमार म्हणाले होते. पण बेगूसराय मधल्या आंदोलनात राहुल गांधींनी कन्हैया कुमार याला हाताशी धरले. काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनानंतर सचिन पायलट तिथे पोहोचले तेव्हा देखील कन्हैया कुमार यांनीच त्यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन केले. कन्हैया कुमार मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायला गेले. बिहार मधल्या सगळ्या समस्यांविषयीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. या सगळ्या प्रकारातून कन्हैया कुमारच्या लाँचिंग विषयी कोणालाच शंका उरली नाही.

    पण जिथे राहुल गांधींचेच “री री री री री लॉन्चिंग” फसले तिथे कन्हैया कुमारचे बिहार मधले “लॉन्चिंग” कसे यशस्वी होईल??, हा सवाल समोर आला. कारण कन्हैया कुमार बिहारमध्ये निवडणूक हरल्यानंतर राज्याकडे फिरवल्याचे दिसलेच नव्हते. कन्हैया कुमारच्या राजकीय कार्यात फारसे सातत्याने राहिले नव्हते. त्यामुळे विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आली असताना कन्हैया कुमारचे तिथले “लॉन्चिंग” कितपत यशस्वी होईल, याविषयी दाट शंकाच आहे. पण कन्हैया कुमारचे ते‌ “लॉन्चिंग” यशस्वी होवो किंवा न होवो, लालू पुत्र तेजस्वी यादवांच्या “री लॉन्चिंगला” त्यातून खोडा घातला गेलाय एवढे मात्र निश्चित!!

    Rahul Gandhi political re launching failed, but he is launching Kanhaiya Kumar in Bihar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!