नाशिक : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काही प्रमाणात चालला, पण हरियाणा विधानसभेत फसला, तोच जातीवादाचा “डाव” राहुल गांधींनी महाराष्ट्रात पुन्हा टाकला!!, असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या आजच्या नागपूर मधल्या संविधान सन्मान मेळाव्यातल्या भाषणाच्या निमित्ताने आली.
हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतल्या काँग्रेसच्या पराभवाचा धडा घेऊन राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कुठला “नवा डाव” खेळतील ही अपेक्षा होती, पण ती त्यांनी फोल ठरवली.
भाजपच्या राजकीय हिंदुत्वाला टक्कर देण्यासाठी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीतल्या बाकीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात जातीवादाचा डाव लोकसभा निवडणुकीत टाकला होता. मनोज जरांगे यांच्या नावाने मराठा आरक्षणाचा विषय मास्टर माईंडने आरक्षण ऐरणीवर आणला होता. त्याचा काहीसा लाभ महाविकास आघाडीला झाला. महाविकास आघाडीने लोकसभेच्या 48 पैकी 31 जागांवर विजय मिळवला. भाजप आणि महायुतीला बॅक फुटवर जावे लागले होते.
त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा जातीवादाचाच डाव टाकून पाहिला. लोकसभेत चाललेले मुद्दे पुन्हा हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जसेच्या तसे उगाळले. पण त्या निवडणुकीत “बटेंगे तो कटेंगे” हा “योगी मंत्र” चालला. जातीवादाविरुद्ध हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा आघाडीवर आला. हिंदूंच्या एकजुटीमुळे हरियाणातले मतदान जातीवादाच्या विरोधात गेले. तिथे काँग्रेसला अनपेक्षित पराभव पत्करावा लागला.
परंतु, त्या निवडणुकीतून धडा घेऊन महाराष्ट्रात राहुल गांधी कुठला वेगळा डाव टाकतील अशी अपेक्षा होती. परंतु, तसा कुठलाही वेगळा “डाव” टाकण्याऐवजी राहुल गांधींनी आज नागपूरच्या संविधान सन्मान मेळाव्यात पुन्हा जातीवादाचाच “डाव” टाकला. त्यांनी जातनिहाय जनगणना करणार, ओबीसींना सगळीकडे प्रतिनिधित्व देणार, आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणार वगैरे घोषणा केल्या. महाराष्ट्रात हरियाणा सारखीच हिंदूंची एकजूट पुन्हा उभी राहात असताना त्याला जातीवादाचा छेद देण्याचा प्रयत्न केला.
– फडणवीस + बावनकुळेंच्या तोफा
राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन पुन्हा जातीवादाचाच “डाव” टाकणार याचा अंदाज येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर तोफा डागल्या होत्या. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन लोकांना भीती दाखवतात, ते लाल वेष्टणातले पुस्तक अर्बन नक्षलवादाचे प्रतिनिधित्व करते. राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने अर्बन नक्षल्यांनाच एकत्र करत होते, असे आरोप फडणवीस आणि बावनकुळे या दोन्ही नेत्यांनी केले होते. त्या आरोपांना राहुल गांधी आजच्या भाषणातून “जागले”. त्यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्या अपेक्षेप्रमाणे जातीवादाचाच “डाव” टाकला!! आता राहुल गांधींचा हा जुनाच “डाव” कितपत यशस्वी होतो, हे येत्या 15 दिवसांत समजेल.
Rahul Gandhi plays failed casteist card again in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Nandankanan : भारतीय रेल्वेशी संबंधित मोठी बातमी! नंदनकानन एक्स्प्रेसवर गोळीबार, दहशतीचे वातावरण
- Sanjay Verma :संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती!
- Jaishankar : जयशंकर यांनी कॅनडाला फटकारले; हिंदू आणि मंदिरांवरील हल्ल्यांवर जोरदार टीका केली
- Shahu Maharaj कोल्हापुरात काँग्रेसमध्ये काल रंगले माघारनाट्य + संतापनाट्य; आज खासदार शाहू महाराजांनी लिहिले सर्वांना पत्र!!