विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या आवारामध्ये आंदोलनादरम्यान भाजपच्या खासदारांना धक्काबुक्की करून जखमी करणाऱ्या राहुल गांधींचे विरोधी पक्ष नेतेपद कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. भाजपच्या खासदारांनी राहुल गांधींनी विरुद्ध संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे राहुल गांधींचे विरोधी पक्ष नेतेपद कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे. राहुल गांधींना वाचवण्यासाठी काँग्रेस सकट सगळे विरोधक एकवटले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कथितपणे अपमान केल्याच्या मुद्दा आज दिवसभर संसदेत आणि देशावर पेटला होता. त्यातच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी जोरदार निदर्शने करत मकरद्वारा मार्गे संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी भाजपचे खासदार मुकेश राजपूत आणि प्रताप चंद्र सरंगी यांना धक्काबुक्की केली त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यानंतर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जोरदार हंगामा झाला काँग्रेस आणि भाजपचे सदस्य एकमेकांवर अक्षरशः धावून गेले. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर, बांसुरी स्वराज आदींनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला यामध्ये कलम 109 खुनाचा प्रयत्न कलम 115 दुखापत करणे कलम 117 कलम 121 सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यापासून बाजूला करण्यासाठी दुखापत करणे कलम 351 गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे आणि कलम 125 इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणे या गंभीर कलमांचा समावेश आहे. ही सगळी कलमे लक्षात घेता राहुल गांधींचे विरोधी पक्षनेते पद कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत.
आपल्या विरोधी पक्षनेते पदाला कायदेशीर धोका उत्पन्न होताच राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. आपल्यावरचे सगळे आरोप त्यांनी फेटाळले. उलट मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच्या खासदारांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. राहुल गांधींना वाचवण्यासाठी काँग्रेस सह विरोधी पक्षाचे खासदार एकवटले.
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते पदावर राहण्याच्या लायकीचे नेते नसल्याचा आरोप केला.