• Download App
    विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी केले सांत्वन|Rahul Gandhi offers condolences after Virat Kohli's resignation

    विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी केले सांत्वन

    विराट कोहलीच्या राजीनाम्यावरुन नेटकऱ्यांनी BCCI च यामागे मोठं राजकारण असल्याची टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे.Rahul Gandhi offers condolences after Virat Kohli’s resignation


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी संघातील कर्णधारपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. दरम्यान विराट कोहलीच्या राजीनाम्यावरुन नेटकऱ्यांनी BCCI च यामागे मोठं राजकारण असल्याची टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे.

    तर काही नेटकऱ्यांनी कोहलीवरही टीका केली होती. पण आता कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याने नेटकऱ्यांनी ट्विटरवर #ShameOnBCCI असा हॅशटॅग ट्रेंड केला आहे.
    दरम्यान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनीसुद्धा ट्वीट करुन आम्ही अशावेळेतसुद्धा तुझ्यासोबत आहोत असं म्हटलं आहे.



    या ट्वीटमध्ये राहूल गांधी यांनी म्हटलंय की, ”प्रिय विराट, तुझ्या लाखे क्रिकेट चाहत्यांनी इतके वर्षे तुझ्यावर प्रेम केलंय. ते तुझ्यावर या काळातसुद्धा प्रेम करत राहतील आणि तुला पाठिंबा देत राहतील. तुझ्या येणाऱ्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा.”अशा शब्दांत ट्वीट करुन राहूल गांधी यांनी विराट कोहलीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

    Rahul Gandhi offers condolences after Virat Kohli’s resignation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य