• Download App
    Rahul Gandhi सावरकरांच्या संविधानिक विचारांविषयी राहुल गांधी लोकसभेत बोलले, पण ते किती खरे??, किती खोटे??

    Rahul Gandhi : सावरकरांच्या संविधानिक विचारांविषयी राहुल गांधी लोकसभेत बोलले, पण ते किती खरे??, किती खोटे??

    लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी संविधान विषयक चर्चेची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातल्या एका उताऱ्याद्वारे केली पण त्यांनी तो उतारा अर्धवटच वाचून दाखविला. सावरकरांनी मनुस्मृतीचा संदर्भ देताना त्यातली फक्त ऐतिहासिकता घेतली होती. परंतु, वर्तमान आणि भविष्य याचा विचार करता भारत आधुनिक विज्ञानवादाच्याच आधारावर चालला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन केले होते. मात्र तो भाग राहुल गांधींनी आपल्या भाषणातून चलाखीने वगळला.

    लोकसभेतल्या संविधान विषयी चर्चेत राहुल गांधींनी अनावश्यकणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव त्यामध्ये ओढून सावरकरांना हिंसाचाराचे आणि मनुस्मृतीचे समर्थक ठरविले. सावरकरांना संविधानाद्वारे नव्हे, तर मनुस्मृतिद्वारे देश चालवायचा होता, असा दावा करून राहुल गांधींनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संविधानिक विचार लक्षात घेता ही सगळी टीकेची झोड वस्तुस्थितीला धरून नसल्याचीच बाब समोर आली. किंबहुना राहुल गांधींनी सावरकरांची बदनामी करण्यासाठीच त्यांच्या पुस्तकातला अर्धवट कोट वाचून दाखवल्याचे स्पष्ट झाले.

    सावरकर प्रेरित संविधान

    मूळात भारतीय संविधानाची निर्मिती होण्याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पक्ष हिंदू महासभेने भारतीय स्वातंत्र्याचा विचार करून एक स्वतंत्र संविधान निर्मिती केली होती, ही बाबच अनेकांना माहिती नाही. कारण काँग्रेसी नसलेला प्रत्येक विचार इतिहासातून उखडून टाकायचा किंवा झाकून टाकायचा हा गेल्या 75 वर्षांचा काँग्रेसी प्रवृत्तीचा खाक्या राहिला.

    त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेतून त्यांच्या हिंदू महासभा पक्षाने एक संविधान तयार केले होते, ज्याच्या आधारे हिंदू महासभा नावाचा राजकीय पक्ष स्वतंत्र हिंदुस्थानचे राज्यशकट लोकशाही मार्गाने चालवू इच्छित होता, याचे भानच कोणाला नाही, तर ते राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेत्याला असण्याची सुताराम शक्यता नाही.

    पण म्हणून सावरकरांच्या संविधानिक विचारांची ऐतिहासिक महत्त्वता त्यामुळे कमी होत नाही सावरकरांच्या हिंदू महासभेने 1944 मध्ये स्वतंत्र हिंदुस्थानचे संविधान कसे असावे याची रूपरेखा तयार केली होती. त्यामुळे स्वतः सावरकरांचे मार्गदर्शन होते, कारण ते स्वतः बॅरिस्टर म्हणजेच कायदेतज्ञ होते.

    सावरकर प्रेरित संविधानामध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे लोकशाहीचा पुरस्कार होता.

    स्वतंत्र हिंदुस्थानची शासन व्यवस्था लोकशाही केंद्रित आणि द्विदल राज्यपद्धतीची म्हणजे “फेडरल सिस्टीम”ची असेल त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांचे विशिष्ट अधिकार आणि कर्तव्ये स्पष्टपणे नमूद असतील, हे त्या संविधानात नमूद केले होते.

    स्वतंत्र हिंदुस्थानच्या नागरिकाला दरडोई एका मताचा अधिकार कुठलाही भेदभावाशिवाय मिळेल ही बाब त्या संविधानात अधोरेखित केली होती. इतकेच काय, पण त्या संविधानात “राईट टू रिकॉल” याची देखील तरतूद केली होती, जी विद्यमान संविधानात आजही अस्तित्वात नाही.

    संविधान कलम 7 (xv) नुसार स्वतंत्र हिंदुस्थानच्या राज्य व्यवस्थेला स्वतःचा धर्म नसेल, म्हणजे स्वतंत्र हिंदुस्थान हे कोणत्याही धर्माची सरकार पुरस्कृत व्यवस्था नसेल. घटनात्मक दृष्ट्या हिंदुराष्ट्र फेटाळल्याची ही महत्वपूर्ण बाब होती. याचा अर्थ राज्यव्यवस्था पूर्ण धर्मनिरपेक्ष असेल.

    Farmers : दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा, 17 जखमी; उद्या देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चा

     त्याचवेळी संविधान कलम 7 (xi) नुसार

    हिंदुस्थानचे सर्व नागरिक समान असतील. त्यांच्यात धर्म, वंश, पंथ, लिंग यावर आधारित भेदभाव करता येणार नाही. त्यांना समान अधिकार आणि समान कर्तव्ये असतील. अल्पसंख्यांकांना आपला धर्म, भाषा, वंश, पंथ, जपण्याचा पूर्ण संविधानात्मक अधिकार असेल.

    त्याचबरोबर संविधान कलम 6 आणि 7(i), (ii) नुसार राज्य कुठल्याही नागरिकांमध्ये हिंदू – मुसलमान अथवा अन्य धर्म, पंथ, जाती, लिंग यासंदर्भात कुठल्याही कायद्यानुसार भेदभाव करू शकणार नाही.

    हे सर्व मुद्दे सावरकर प्रेरित हिंदू महासभेच्या संविधानामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते.

    – संविधान सभेशी सावरकरांचा पत्रव्यवहार

    यासंदर्भात स्वतंत्र भारताच्या संविधान सभेची स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वतंत्र पत्रव्यवहार देखील राहिला होता. त्याचबरोबर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे हिंदू महासभेचे नेते म्हणून भारतीय संविधान सभेचे सदस्य होते. त्याचबरोबर नेहरू मंत्रिमंडळात केंद्रीय उद्योग मंत्री राहिले होते.

    काँग्रेसचे तत्कालीन वरिष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ यांनी देखील अनेकदा हिंदू महासभेच्या या संविधानाच्या तरतुदींच्या आधारे भारतीय संविधान सभेमध्ये काही घटनात्मक तरतुदींवर विचार मांडून सुधारणा सूचविल्या होत्या. त्यात कुठेही सावरकरांनी मनुस्मृतीचे समर्थन केलेले नव्हते किंबहुना आपला देश कुठलाही श्रुतीस्मृतीपुराणोक्त पद्धतीने चालवू नये, तर तो आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर उतरणाऱ्या विचारांच्या आधारे चालावा असे ठाम प्रतिपादन सावरकरांनी केले होते.

    Rahul Gandhi misquoted savarkar’s thoughts on constitution

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक