वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीत नऊ वर्षांच्या दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्या या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संसदेत आणि संसदेबाहेर घेरण्याची विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi
तृणमूळ काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी अमित शहा यांनी संसदेत येऊन दिल्ली बलात्कार आणि हत्या प्रकरणात निवेदन दिले तर मी मुंडण करेन, असे विचित्र आव्हान दिले आहे. तर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी जुन्या नांगल नगरमध्ये जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
नऊ वर्षाच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिच्यावर तिच्या आई-वडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले जुन्या नांगल नगरमध्ये घटना घडली. या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी तिथे जाऊन भेट घेतली.
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमित शहा यांना गृहमंत्री पद पेलत नाही. हाथरसपासून दिल्लीपर्यंत बलात्कारांच्या घटनांची साखळी मोठी आहे. देशात महिला – मुली सुरक्षित नाहीत आणि गृहमंत्री नुसती प्रमाणपत्रे वाटत फिरत आहेत, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. संसदेत अमित शहा यांच्यावर दिल्लीतील दलित मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी जोरदार भडीमार होणार आहे.
Rahul Gandhi met the family of a girl victim of a rape and murder case in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना खलिस्तानवाद्यांकडून धमक्या, पण फुटीरवाद्यांशी सामना करण्यास आम्ही पूर्ण सज्ज असल्याचे खट्टर यांनी ठणकावले
- धमकाविण्याची फॅशन योग्य नाही, संसदेत निर्मला सीतारामन यांनी खासदारांना सुनावले
- करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली
- लालूप्रसाद यादव यांचा चिराग पासवान यांना गळाला लावण्याचा प्रयत्न, तेजस्वी आणि त्यांनी एकत्र यावे अशी व्यक्त केली इच्छा