विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 7 फुटांपर्यंत उंची चढलेला कागदपत्रांचा ढिग दाखवून राहुल गांधींनी केले आरोप; पण निवडणूक आयोगाने मागितले फक्त त्यांच्या सहीचे प्रतिज्ञापत्र!!, अशी राजकीय खेळी आज देशात घडली.
राहुल गांधींनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या मतदान घोटाळ्याचा खुलासा करत असल्याचा दावा केला. त्यामध्ये त्यांनी प्रेझेंटेशन द्वारे 7 फुटांपर्यंत कागदपत्रांचा ढिग दाखवला. वेगवेगळी आकडेवारी सादर करून मतांची चोरी झाल्याचा आरोप केला. त्यामध्ये निवडणूक आयोग आणि भाजप सरकार यांना एकाच तागडीत तोलले.
कर्नाटकात मतांची चोरी झाल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी वेगवेगळी आकडेवारी सादर केली. त्यामध्ये 33692 नावांचा दुरुपयोग करण्यात आला. त्यांची वय 95, 96, 97, 66 अशी वेगवेगळी असल्याचा दावा केला. त्यापैकी एकही नाव खरे आढळले नसल्याचा दावा राहुल गांधींनी केला.
एक लाख 250 मतांची चोरी करण्यात आली त्यापैकी 11965 नावे बनावट होती. 40009 मतदारांनी खोटे पत्ते दिले होते. 4132 मतदारांचे चुकीचे फोटो होते. फॉर्म सहाचा गैरवापर करून 33962 मतदारांनी मतदान केले, अशी मोठी आकडेवारी देऊन राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आणि भाजप मतदान चोरी केल्याचा आरोप केला.
राहुल गांधींनी प्रेझेंटेशन करून आकडेवारी सादर केल्यामुळे त्यांची पत्रकार परिषद मोठ्या प्रमाणावर गाजली. निवडणूक आयोगाने देखील या पत्रकार परिषदेची दखल घेतली कर्नाटक निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना ताबडतोब पत्र पाठवून संबंधित आकडेवारी निवडणूक आयोगाला सादर करावी त्याचबरोबर स्वतःच्या सहीचे लेखी प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश दिले जेणेकरून राहुल गांधींनी केलेल्या आरोपाची सखोल चौकशी आणि तपास करून निर्णय घेता येईल असे निवडणूक आयुक्तांनी पत्रात नमूद केले.
त्यामुळे आता राहुल गांधी फक्त पत्रकार परिषदा घेऊन आरोप करणार, की कर्नाटकाच्या निवडणूक आयुक्तांनी निर्देश दिल्यानुसार स्वतःच्या सहीचे प्रतिज्ञापत्र सादर करून मतदान चोरीची आकडेवारी सादर करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Rahul Gandhi made allegations by showing a pile of documents up to 7 feet high
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi राहुल गांधींचा परदेशी अजेंडा? भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये परदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्यासाठी चिथावणी
- मोदींच्या जपान आणि चीन दौऱ्यानंतर ट्रम्प भारताच्या विरोधातले टेरिफ युद्ध पुढे रेटू शकतील का??
- बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची लिटमस टेस्ट!!
- Satyapal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; 4 राज्यांचे राज्यपाल पद भूषवले