वृत्तसंस्था
चंदिगड : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी आपल्या अमेरिका दौऱ्यात भारतातल्या मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट देऊन टाकले. तेथे त्यांनी केलेल्या भाषणांमधून आणि प्रेस क्लब मधल्या संवादामधून भारतात लोकशाही संस्थांचा गळा घोटला जात असल्याची टीका केली. इंग्लंड दौऱ्यात उपस्थित केलेले मुद्देच त्यांनी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यात उपस्थित केले. Rahul Gandhi running hate India campaign on foreign soil, targets hariyana home minister
मात्र त्यांनी मुस्लिम लीगला धर्मनिरपेक्षतेचे सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांच्यावर भारतात सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी तिखट शब्दांमध्ये राहुल गांधींवर टीका केली आहे. अनिल वीज म्हणाले, की राहुल गांधींना मी अजून माहिती नाहीये की भारत स्वतंत्र झाला आहे. भारतातल्या समस्या ते परदेशामध्ये जाऊन तिथल्या लोकांना सांगत आहेत. पण भारतातल्या समस्या या भारतीयांनी निवडून दिलेल्या सरकारांनीच सोडवण्याची जबाबदारी आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन हेट इंडिया कॅम्पेन चालवत आहेत. काही प्रायोजित लोकांना एकत्र करून ते भारतात लोकशाही नसल्याचा आभास निर्माण करत आहेत. ते मोहब्बत की बाजार में नफरत के सौदागर बनले आहेत.
राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान हिंदीत एक कहावत तयार केली होती. “नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान”, असे ते म्हणाले होते. आज अनिल विज यांनी राहुल गांधींना त्यांच्याच भाषेत खणखणीत प्रत्युत्तर देत ते “मोहब्बत के बाजार में नफरत के सौदागर” बनले असल्याची टीका केली आहे.
Rahul Gandhi running hate India campaign on foreign soil, targets hariyana home minister
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा