“शहजादे को नवाब बनना है…”, असा टोलाही लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाची टीका सुरूच आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये दिलेल्या वक्तव्याबाबत भाजपा संसदेपासून ते रस्त्यापर्यंत हल्लाबोल करत आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल गांधी यांच्या लंडनमधील वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. Rahul Gandhi is currently the Mir Jaffer of Indian politics comments by Sambit Patra
संबित पात्रा यांनी सांगितले की, ‘शहजादाला नवाब बनायचे आहे’. राहुल गांधींना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागणार आहे. परदेशात भारताचा अपमान करून कोणीही सुटू शकत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीबाबत लंडनमध्ये केलेल्या टिप्पणीबद्दल भाजपने मंगळवारी त्यांना सध्याच्या भारतीय राजकारणातील ‘मीर जाफर’ म्हणून संबोधले आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे म्हटले आहे.
संबित पात्रा म्हणाले, “मीर जाफरने नवाब होण्यासाठी जे काय केले आणि राहुल गांधींनी लंडनमध्ये जे केले, ते बिल्कुल तसेच आहे. ‘शहजादाला नवाब बनायचे आहे, आजच्या मीर जाफरला माफी मागावीच लागेल.” राहुल गांधी यांनी परदेशी भूमीतून भारताचा अपमान केल्याचा आरोप करत पात्रा यांनी असे म्हटले की, काँग्रेस नेत्याने देशाविरोधात बोलणे अगदी सामान्य आहे. राफेल प्रकरणातही राहुल गांधींना माफी मागावी लागली आणि आज त्यांना संसदेतही माफी मागावी लागणार आहे. राहुल गांधी हे सध्या भारतीय राजकारणातील मीर जाफर आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Rahul Gandhi is currently the Mir Jaffer of Indian politics comments by Sambit Patra
महत्वाच्या बातम्या
- Umesh Pal Murder Case : ५ लाखांचा इनाम असलेला शूटर गुलाम मोहम्मदच्या घरावर बुलडोझर
- रामसेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार
- मुंबई – गोवा महामार्गाची प्रतीक्षा डिसेंबर 2023 अखेरपर्यंत संपणार; काम पूर्ण होणार!!
- लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल दिल्लीत शिखांचा संताप; ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने