विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rahul Gandhi लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आज पुन्हा अपमान केला. भारतीय संविधानात सावरकरांचा हिंसक आवाज आहे का??, असा अपमानास्पद सवाल राहुल गांधींनी संविधान दिनाच्या कार्यक्रमात केला. भारतीय संविधानात गौतम बुद्ध, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे आवाज आहेत, पण सावरकरांचा हिंसाचाराच्या समर्थनाचा आवाज यात नाही, असे उद्गार राहुल गांधींनी काढले.Rahul Gandhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा विषय ऐरणीवर आणून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते, की तुमच्या आघाडीतले नेते राहुल गांधी यांच्या तोंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्यागाविषयी दोन चांगले उद्गार काढून दाखवा. पवार आणि ठाकरे या दोघांनीही ते आव्हान स्वीकारले नाहीच, पण आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुका संपल्या बरोबर लगेच राहुल गांधींनी संविधान दिनाच्या कार्यक्रमात सावरकरांचा पुन्हा एकदा अपमान केला. सावरकरांच्या क्रांतिकार्याला हिंसाचाराचे लांछन लावून राहुल गांधी मोकळे झाले.
राहुल गांधी म्हणाले, संविधानात सावरकरांचा आवाज नाही या संविधानात कुठे असे लिहिले आहे, की तुम्ही हिंसा करून दुसऱ्याला मारून किंवा कापून सत्ता गाजवा, हे मला तुम्ही दाखवून द्या. या संविधानात खोटं बोलून सत्ता चालवा, असं लिहिलं असेल तर तेही मला दाखवा!! या संविधानात फक्त सत्य आणि अहिंसेचा आवाज आहे!!
या वक्तव्यातून राहुल गांधींनी सावरकर हिंसेचे समर्थक होते. दुसऱ्याला मारून आणि कापून सत्ता गाजवायचे समर्थन त्यांनी केले, असा अप्रत्यक्ष दावा करून सावरकरांच्या विचारांचा आणि क्रांतिकार याचा अपमान केला.
Rahul Gandhi insults Savarkar again; Does Savarkar have a violent voice in the constitution??, questioned!!
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या वळणावर, की परस्पर माध्यमांनीच बातम्यांचे पतंग हवेत उडविले उंचावर?
- Sambhal case : संभल प्रकरणी मोठी कारवाई, सपा खासदार अन् आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल
- Andaman waters : मोठी बातमी! अंदमानच्या पाण्यात तब्बल 5 टन ड्रग्ज जप्त
- Ajit pawar बरं झालं अजितदादा आधीच सत्तेच्या वळचणीला आले, नाही तर तुतारी मार्गे बाराच्याच भावात गेले असते!!