• Download App
    कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या; पण अतीकच्या बातम्यांपुढे नॅशनल मीडियात झाकोळल्या!! Rahul Gandhi held two rallies in Karnataka

    कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या; पण अतीकच्या बातम्यांपुढे नॅशनल मीडियात झाकोळल्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींनी देशभरात अदानी मुद्दा राजकीय दृष्ट्या पेटवल्यानंतर गेले काही दिवस तो सातत्याने नॅशनल मीडियाचा फोकल पॉईंट बनला होता. आज तोच मुद्दा राहुल गांधींनी कर्नाटकच्या दोन रॅलीमध्ये उपस्थित केला. पण उत्तर प्रदेशातील गँगस्टर माफिया अतीक अहमद याच्या हत्येच्या बातम्यांपुढे राहुल गांधींच्या कर्नाटकातल्या दोन रॅली पूर्णपणे झाकोळून गेल्या होत्या. Rahul Gandhi held two rallies in Karnataka

    कर्नाटकातील कोलार आणि बेंगलोर मध्ये राहुल गांधींच्या दोन रॅली झाल्या. या दोन्ही रॅलीमध्ये राहुल गांधींनी अदानी मुद्दा लावून धरला होता. गौतम अदानींच्या शेल कंपनीमध्ये 20000 कोटी रुपये नेमके कोणाचे आले??, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी अदानींच्या कंपनीमध्ये चिनी संचालक ठाण मांडून बसल्याचा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही रॅलींमध्ये राहुल गांधींनी कर्नाटकात जनतेचा काँग्रेसला प्रचंड पाठिंबा आहे त्यामुळे काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला.


    राहुल गांधींनी रिकामा केला सरकारी बंगला, आई सोनियांच्या घरी झाले शिफ्ट; खासदारकी गेल्यानंतर मिळाली होती घर रिकामे करण्याची नोटीस


    यापैकी कोलारची रॅली राहुल गांधींना डी. के. शिवकुमार यांच्या सूचनेमुळे पुढे ढकलावी लागली होती. ही रॅली पुढे ढकलण्याचे कारण दाखवून डी. के. शिवकुमार यांना कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपद देखील गमवावे लागले होते. काँग्रेस अंतर्गत मोठे राजकारण होऊनही कोलरच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.

    मात्र, कर्नाटकात राहुल गांधींच्या दोन्ही रॅली मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊन देखील नॅशनल मीडियात मात्र त्याचे फारसे प्रतिबिंब पडू शकले नाही. कारण अतिक अहमद याच्या हत्येनंतर नॅशनल मीडियाचा सगळा फोकस पॉइंटच बदलून गेला आहे. अतीक अहमदची हत्या, त्या भोवतालचे गूढ याविषयी नॅशनल मीडियामध्ये एवढा प्रचंड गदारोळ चालू आहे, की त्यापुढे अनेक महत्त्वाच्या बातम्यांना दुय्यमच नव्हे, तर त्याहीपेक्षा खालचे स्थान मिळून गेले. त्यात राहुल गांधींच्या कर्नाटक दौऱ्याची बातमी पूर्णपणे वाहून गेली.

    Rahul Gandhi held two rallies in Karnataka

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य