• Download App
    राजस्थान, छत्तीसगडबाबत राहुल गांधींनी आधीच केली होती भविष्यवाणी, म्हणाले होते...|Rahul Gandhi had already predicted about Rajasthan Chhattisgarh

    राजस्थान, छत्तीसगडबाबत राहुल गांधींनी आधीच केली होती भविष्यवाणी, म्हणाले होते…

    • केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट केला ‘तो’ व्हिडीओ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानबरोबरच छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाने यश मिळवले आहे. यानंतर आता भाजप नेते, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. शिवाय विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधींचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.Rahul Gandhi had already predicted about Rajasthan Chhattisgarh



    ”राहुल गांधींची भविष्यवाणी खरी ठरली.” असं म्हणत गोयल यांनी राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना छत्तीसगड, राजस्थान निवडणुकीबाबत केलेलं विधान दर्शवलं आहे. ज्यावरून राहुल गांधी आता ट्रोल होत आहेत.

    ”राहुल गांधी हाजिर हों…” मानहानीच्या प्रकरणात सुलतानपूर न्यायालयाने बजावले समन्स!

    ”राजस्थानमध्येही सरकार जात आहे आणि छत्तीसगडमध्येही जात आहे.” असं राहुल गांधी त्या व्हिडीओमध्ये म्हणाले होते. आणि आज समोर आलेल्या निकातही तेच झालं. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता गेली आहे. त्यामुळेच राहुल गांधींची ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरल्याचं बोललं जात आहे.विशेष म्हणजे राजस्थान निवडणुकीत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पनौती म्हटलं होतं. ज्यावर भाजपने आक्षेप घेत हा मुद्दा उचलून धऱत, निवडणुकीत मुख्य मुद्दा बनवला होता.

    Rahul Gandhi had already predicted about Rajasthan Chhattisgarh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Punit Garg : RCOM चे माजी अध्यक्ष पुनीत गर्ग यांना अटक; ईडीने 40 हजार कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी अटक केली; फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप

    Amit Shah : शहा म्हणाले- आसाममध्ये 64 लाख घुसखोर, 7 जिल्ह्यांमध्ये त्यांचे बहुमत; काँग्रेसने राज्याला बंदूक-गोळी, संघर्ष आणि तरुणांच्या मृत्यूशिवाय काय दिले

    Hamid Ansari : माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांनी गझनवीला भारतीय लुटारू म्हटले; भाजपने म्हटले- ही विकृत मानसिकता, काँग्रेसला गझनवीच्या 17 हल्ल्यांवर पांघरूण घालायचे आहे का?