वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मोठा वाद झाला होता. याप्रकरणी भाजप सदस्यांनी सादर केलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटिसीला राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयात सविस्तर उत्तर सादर केल्याचे वृत्त आहे.Rahul Gandhi filed a reply to the Breach of Privileges notice, had criticized Prime Minister Modi
7 फेब्रुवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. यादरम्यान त्यांनी उद्योगपती गौतम अदानीसोबतच्या संबंधांवरही अनेक आरोप केले. यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्याविरुद्ध विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस दाखल केली, ज्यावर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते.
सूत्रांचे म्हणणे आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे समर्थन करण्यासाठी विविध कायद्यांचा हवाला दिला आणि अनेक पानांचे उत्तर दाखल केले.
भाषणातील काही भाग रेकॉर्डमधून काढून टाकल्यावर टीका
सोमवारी आपल्या लोकसभा मतदारसंघ वायनाडमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकसभेतील आपल्या भाषणातील काही भाग रेकॉर्डमधून काढून टाकण्याच्या निर्णयावरही टीका केली. राहुल गांधी यांनी संसदेत कोणतीही अपमानास्पद भाषा वापरली नसल्याचा दावा केला आहे.
Rahul Gandhi filed a reply to the Breach of Privileges notice, had criticized Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- टीव्ही डिबेटमध्येच दे दणादण : सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि राजू दास भिडले, प्रभु रामचंद्राचा केला होता अवमान
- महागाईच्या पातळीवर लवकरच मिळेल दिलासा : अर्थमंत्री म्हणाल्या- पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, टॅक्स होणार कमी
- जयंत पाटलांच्या मतदारसंघात भावी मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स!!; दोघात तिसरा की राष्ट्रवादीचा डार्क हॉर्स??
- शरद पवार आणि संजय राऊत हे आता फाटक्या आणि जीर्ण नोटा; गोपीचंद पडळकरांचे शरसंधान