वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी यांनी दुपारी एक वाजता काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधाबाबत आरोपांच्या फैरी झाडल्या. पण देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवल्याबद्दल सुरत कोर्टाने जी दोन वर्षाची शिक्षा दिली आहे, त्याविषयी कायदेशीर मुद्द्यावर प्रश्न विचारतात राहुल गांधी पत्रकारांवरच भडकलेले दिसले.Rahul Gandhi evades legal questions, but targets journalists in his press conference
सुरत कोर्टाने आपल्याला दिलेल्या शिक्षेविरोधात आपण कोणते कायदेशीर पाऊल उचलणार आहात??, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारतात राहुल गांधी भडकले आणि त्या पत्रकारावरच तुम्ही भाजपचे काम करता का?? करायचे असेल तर छातीवर भाजपचा बिल्ला लावून उघडपणे काम करा. स्वतःला पत्रकार म्हणून घेऊ नका, असे सुनावले.
याच पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी बाकीच्या पत्रकारांवरही आरोप केला. मी नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, तेवढेच दाखवा. भाजपचे नेते मुख्य मुद्द्यावरून ध्यान भटकवण्याचा प्रयत्न करतात, तसा तुम्ही प्रयत्न करू नका, असा राहुल गांधींनी पत्रकारांना न मागताच सल्ला दिला.
सावरकरांचा पुन्हा अपमान
या पत्रकार परिषदेत देखील त्यांनी सावरकरांचे नाव घेणे सोडले नाही. देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवण्याच्या तुमच्या वक्तव्याबद्दल तुम्ही माफी मागणार का असा सवाल एका पत्रकाराने राहुल गांधींना विचारला त्यावर माझे नाव राहुल सावरकर नाही. राहुल गांधी आहे, असे उत्तर देऊन राहुल गांधींनी पुन्हा सावरकरांचा अपमान करून भाजपला डिवचले.
https://youtube.com/shorts/JCBBdmChJJo?feature=share
Rahul Gandhi evades legal questions, but targets journalists in his press conference
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय : मुस्लिमांचे आरक्षण रद्द करून या दोन समाजांना दिला ‘फायदा’
- केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, चार टक्के DA वाढवला
- बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा तरी आमदारकी होणार नाही रद्द; सोशल मीडियावर चर्चा, पण कारण काय??
- राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचा मोठा बवाल; पण गेल्या 10 वर्षांत बाकीच्या पक्षांच्याही 11 आमदार, खासदारांचे सदस्यत्व रद्द!!