विशेष प्रतिनिधी
नागपूर : Rahul Gandhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर “नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान” अशी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचेच काँग्रेस नेत्यांनी दैवतीकरण करून टाकले. राहुल गांधींच्या आजीला काँग्रेस नेत्यांनी “दुर्गा” ठरविले होतेच, आता राहुल गांधी यांच्या पाठीशी कुठल्यातरी “अदृश्य हात” किंवा त्यांच्यातच “दैवी शक्ती” असल्याचा “जावईशोध” काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे यांनी लावला.
राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये प्रत्यक्षात 6200 किलोमीटर चालले होते, पण राहुल गांधींचे दैवतीकरण करताना अविनाश पांडे यांनी राहुल गांधी 10000 किलोमीटर चालल्याचे सांगितले. एखादी व्यक्ती कुठलीही दैवी शक्ती अंगात असल्याशिवाय किंवा कुठल्यातरी अदृश्य हाताचा आशीर्वाद असल्याशिवाय 10000 किलोमीटर चालूच शकणार नाही. ज्या अर्थी राहुल गांधी तेवढे चालले, त्या अर्थी त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे. किंवा त्यांच्या पाठीशी अदृश्य हाताचा आशीर्वाद आहे, हे नक्कीच!!, असे अविनाश पांडे म्हणाले.
काँग्रेस पक्ष पुरोगामी आहे, पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “नॉन बायोलॉजिकल” आहेत. त्यांचे देवाशी “डायरेक्ट कनेक्शन” आहे. पण या “डायरेक्ट कनेक्शन” मधून ते फक्त त्यांच्या श्रीमंत बड्या उद्योगपती मित्रांचे भले करतात. त्यांची लाखो करोडो उंची कर्ज माफ करतात. पण देशातल्या शेतकऱ्यांचे, मजुरांचे, विद्यार्थ्यांचे, अल्पसंख्याकांचे हे “नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान” भले करू शकत नाहीत,असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले होते.
पण मोदींवर “नॉन बायोलॉजिकल” पंतप्रधान असल्याची टीका करणाऱ्या राहुल गांधींचे त्यांच्याच “पुरोगामी” काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी दैवतीकरण करून टाकले.
Divine force in Rahul Gandhi, claims Congress leader
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन!!
- Mumbai : मुंबईतील चेंबूर भागात घराला भीषण आग, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
- Chandrakant Handore : मुंबईत पुन्हा हिट अँड रन, काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाने दुचाकीला उडवले, दुचाकीस्वार गंभीर जखमी, गणेश हंडोरेंना अटक
- shivsmarak जुवेरिया बोट, अंगात लाईफ जॅकेट, डोळ्याला दुर्बीण; संभाजीराजेंनी केली अरबी समुद्रात शिवस्मारकाची राजकीय “शोध मोहीम”!