विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भारतात हिंदू समाजात फूट पाडण्याच्या हेतूने जातिगत जनगणनेचा आग्रह धरला. पण अमेरिकेत जाऊन मात्र आरक्षण संपविण्याची भाषा केली. ती अंगलट येताच नंतर घुमजाव पण केले. पण राहुल गांधी इतकेच करून थांबले नाहीत, ज्या शीख फुटीरतावादाने त्यांच्या आजीचा म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळी घेतला, त्या शीख फुटीरतावादाचे राहुल गांधींनी अमेरिकेत जाऊन समर्थन केले. Banned organisation praises Rahul Gandhi
शीख फुटीरतावाद्यांच्या संख्येने भरलेल्या एका मेळाव्यात भाषण करताना राहुल गांधींनी भारतात शीखांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिखांनी पगडी बांधावी की नाही??, कृपाण, कडे धारण करावे की नाही??, गुरुद्वारात जावे की नाही यावरून भारतात मोठे वाद उसळतात, असे वक्तव्य वस्तुस्थितीच्या विरोधात करून शीख फुटीरतावादाला खतपाणी घातले.
राहुल गांधींचे हे वक्तव्य “सिख फॉर जस्टिस” या खलिस्तानी संघटनेचा फुटीरतावादी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने बरोबर उचलले. हा तोच गुरुपतवंत सिंग आहे, जो नेहमी भारतीय नेत्यांच्या हत्येच्या भारतात दंगल उसळवण्याच्या चिथावण्या देणारे व्हिडिओ प्रसारित करत असतो.
या गुरुपतवंत सिंग पन्नूने खलिस्तानी “सिख फॉर जस्टिस”च्या लेटरहेडवर राहुल गांधींचे वक्तव्य छापून राहुल गांधींनी “शीख स्वातंत्र्यासाठी आणि पंजाबच्या स्वायत्तते”साठी कसा पाठिंबा दिला, याचे वर्णन केले. भारतात 1947 पासूनच्या सगळ्या सरकारांनी शिखांवर अन्याय आणि अत्याचार केले, याची कबुली राहुल गांधींनी दिल्याचा दावा गुरुपतवंत सिंग पन्नूने केलाच, पण राहुल गांधींच्या वक्तव्याचा जोरदार प्रचार प्रसार आपल्या फुटीरतावादी अजेंड्यासाठी करून घेतला.
Banned organisation praises Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil : अजितदादांना त्यांच्याच राष्ट्रवादीचे बारामतीतून “परस्पर” तिकीट; जयंत पाटलांची “करामत”!!
- Sitaram Yechury : CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक!
- Naib Saini : हरियाणात मुख्यमंत्री नायब सैनी यांनी लाडवा येथून दाखल केला उमेदवारी अर्ज
- Hardeep Singh Puri : शीखांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करणार!