विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पनौती, बेडरूम, बाथरूम; मोदी द्वेषाचे गॅसेस आले सुटून!!, असे म्हणायची वेळ मोदी विरोधकांनी आणली आहे.Rahul Gandhi and kiri azad targets Modi over his meeting with Indian cricket team
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीही केले किंवा न केले तर टीकाच करत सुटायची एवढेच काम विरोधकांना उरले आहे. बरं टीकेत काही कल्पकता असावी, काही तथ्य असावे किंवा ती टीका खरंच मोदींना चिकटावी किंवा टोचावी असे काही असावे, तर तसेही दिसत नाही.
आता हेच पहा ना राजस्थानतल्या बारमेरमध्ये राहुल गांधींनी मोदींवर केलेल्या टीकेत त्यांना PM मतलब पनौती मोदी म्हटले. भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकली असती, पण पनौती मोदी तिथे पोहोचले आणि भारतीय टीम हरली, अशी मुक्ताफळे उधळली. आता ही टीका मोदींना चिकटते का?? खरंच असे काही घडले आहे का?? मोदींमुळे भारतीय टीम हरली आहे का??, तर अजिबात नाही.
उलट मोदींनी मॅच संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमला वर्ल्डकप देण्याचा औपचारिक सोहळा पार पाडल्यानंतर स्वतः भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन त्यांचे सांत्वन केले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली मोहम्मद शमी, टीमचा कोच राहुल द्रविड यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. कोणत्याही खेळात हार – जीत असतेच अशा शब्दांमध्ये त्यांचा धीर वाढविला.
पण मोदींची ही कृती देखील एकेकाळी त्यांचाच समर्थक असलेला नेत्याला खटकली. आता हा नेता योगायोगाने क्रिकेटपटू होता. तो देखील 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीम मधला सदस्य. पण त्यावेळी वर्ल्ड कप जिंकण्यात त्याचा फक्त एका धावेचा वाटा होता.
कीर्ती आझादने मोदींच्या भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाण्यावर टीका करणारी पोस्ट लिहिली. क्रिकेटपटूंची ड्रेसिंग रूम ही मंदिरातल्या गाभाऱ्यासारखी पवित्र असते तिथे क्रिकेटपटू वगळता आणि त्यांचा सपोर्ट कोणालाही जायची परवानगी नसते, पण मोदी तिथे गेले ही चूक झाली. मोदींनी ड्रेसिंग रूम मध्ये जाण्याऐवजी गेस्ट रूम मध्ये आपल्या खेळाडूंना भेटले असते तर चांगले झाले असते. हे मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता म्हणून सांगत नाही, तर एक खेळाडू म्हणून सांगतो आहे, असे कीर्ती आझादने पोस्टमध्ये लिहिले.
पण एवढेच लिहून कीर्ती आझाद थांबला नाही, तर त्या पलीकडे जाऊन असे लिहिले की पंतप्रधान मोदी आपल्या समर्थकांना किंवा भक्तांना बेडरूम मध्ये अथवा बाथरूम मध्ये बोलवून अभिनंदन स्वीकारतील का?? किंवा स्वतःचे सांत्वन करून घेतील का?? असा बोचरा सवाल केला. इथेच कीर्ती आझादने मोदी द्वेषाचे टोक गाठले.
कीर्ती आझाद हे पूर्वी भाजपचे नेते होते. भाजपचे दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले होते. पण ते आणि वाजपेयींच्या मंत्रिमंडळातले माझी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा मोदींना विरोध करत भाजपच्या बाहेर पडले. कीर्ती आझादांनी काँग्रेस गाठली, पण तिथे त्यांना अपयश आले. एवढे करूनही त्यांनी मोदी द्वेष सोडला नाही. मोदी भारतीय टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले त्यांनी भारतीय टीमचे सांत्वन केले हे देखील त्यांना खटकले. त्यामुळे मोदी द्वेषातून त्यांनी वर उल्लेख केलेली पोस्ट लिहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही वैयक्तिक टार्गेट करू नका. त्याने काँग्रेस सारख्या विरोधी पक्षाचे मोठे नुकसान होते, असे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेत्यांच्या कानी कपाळी ओरडून सांगितले, पण त्याने काँग्रेसने त्यांना काहीच फरक पडला नसल्याचे या मोदी द्वेषातून दिसून आले.
Rahul Gandhi and kiri azad targets Modi over his meeting with Indian cricket team
महत्वाच्या बातम्या
- सरकार बनताच 4 टक्के मुस्लीम आरक्षण हटवले जाईल’, तेलंगणात गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा
- अभिनेता अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री अन्विता फलटणकर यांची विश्वचषकाबाबत पोस्ट व्हायरल!
- ‘हिंदू राष्ट्रा’साठी संविधानात दुरुस्ती करा, धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम यांची मागणी!
- महाराष्ट्रात मनोज जरांगेंच्या रूपात अण्णा हजारे नव्हे, तर पवारांसाठी शरद जोशी + दत्ता सामंत यांच्या बफर नेतृत्वासारखा प्रयोग!!