• Download App
    Rahul Gandhi महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी; याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!!

    महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी; याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!!

    नाशिक : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!! असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या लेखाने आणली.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पराभवावर राहुल गांधींनी मॅच फिक्सिंगचा लेख लिहिला तो देशातल्या अनेक वर्तमानपत्रांनी छापला. त्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या फक्त शरद पवारांनी मात्र तो लेख सकाळी “बाजूला” ठेवून सायंकाळी गंभीरपणे वाचणार असल्याचे सांगितले.

    पण या लेखामध्ये राहुल गांधींनी केलेल्या नव्या आरोपामुळे त्यांनी पराभवाचीच कबुली दिली असंच खरं म्हणजे समोर आले. महाराष्ट्रात भाजपने निवडणुकांचे मॅच फिक्सिंग कसे केले, त्याचे टप्पे राहुल गांधींनी लेखामध्ये समजावून सांगितले. मतदार यादी मध्ये फेरफार केला, शेवटच्या टप्प्यात मतदान वाढविले, त्याचे सगळे पुरावे लपविले, पण सगळ्यात आधी निवडणूक आयोगच मॅनेज करून “पंच” स्वतःच ठरविला, अशा आरोपांच्या फैरी राहुल गांधींनी भाजपवर झाडल्या.



    – काँग्रेसला यश का नाही टिकवता आले?

    वास्तविक लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात 13 खासदार निवडून आणले होते विशाल पाटलांच्या रूपाने निवडून आलेला अपक्ष खासदार देखील काँग्रेसला येऊन मिळाला होता. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस खासदारांची संख्या 14 झाली. चौथ्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रात पहिल्या नंबर वर गेला. पण काँग्रेसच्याच मित्र पक्षांना काँग्रेसचा विजय पचला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसवर “डाव” केला. काँग्रेसला आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत मिळालेले यश विधानसभेच्या निवडणुकीत टिकवता आले नाही. पण याविषयी राहुल गांधींनी लेखामध्ये चकार शब्द लिहिलेला नाही. त्यांनी फक्त भाजपने मॅच फिक्सिंग केले एवढाच आरोप केला आणि त्यापुढे जाऊन महाराष्ट्र नंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी चालू आहे, असा दावा केला.

    – कन्हैया कुमारची गॅरंटी नाही

    महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला म्हणून राहुल गांधींना मॅच फिक्सिंग आठवले. अजून बिहारची विधानसभा निवडणूक काही महिने लांब आहे. तिथे राहुल गांधींनी कन्हैया कुमारला काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रमोट करून विधानसभा निवडणूक जिंकायची तयारी चालवली आहे. पण त्याचवेळी लालू पुत्र तेजस्वी यादव यांनी काँग्रेस पासून अंतर राखले आहे. त्यामुळे आपण कन्हैया कुमारला प्रमोट केले, तरी निवडणूक जिंकणार नाही याची राहुल गांधींना धास्ती वाटायला लागलीय. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्र नंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी सुरू झाल्याचा आरोप केलाय की काय??, अशी शंका यायला वाव आहे.

    Rahul Gandhi accepts defeat in Bihar like Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू