वृत्तसंस्था
रायपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे तर सोडाच, पण राहुल गांधींनी त्याच दिवशी त्यांच्यावर टीका केली आहे. बलवानांपुढे झुका हीच त्यांची विचारधारा होती आणि हीच विचारधारा भाजपचे सरकार पुढे नेत आहे, असे टीकास्त्र राहुल गांधींनी काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सोडले आहे. Rahul criticizes Savarkar even on his death anniversary
छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये काँग्रेसचे दोन दिवसांचे महाअधिवेशन झाले. या महाधिवेशनाच्या काळात काँग्रेसच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक ठरावांपेक्षा सोनिया गांधी यांच्या निवृत्तीची चर्चा जास्त झाली आणि माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या आल्या. इतकेच नाही, तर राजकीय ठराव अथवा काँग्रेस कार्यकारणीतले महत्त्वाचे फेरबदल या बातम्यांपेक्षा राहुल गांधी हे काँग्रेसच्या पुढचा चेहरा असतील आणि मल्लिकार्जुन खर्गे हे संयुक्त पुरोगामी आघाडीचा चेहरा असतील अशा बातम्या जास्त आल्या.
त्यामुळेच राहुल गांधींना महाअधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर आपला टीआरपी वाढवून घेण्यासाठी सावरकरांचाच आधार घ्यावा लागला. त्यांनी भाजपवर टीका करताना सावरकरांचे नाव मध्ये आणले. बलवानांसमोर झुकणे हीच सावरकरांची विचारधारा होती आणि तीच विचारधारा भाजप सरकार पुढे नेते आहे. चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे म्हणून आपण चीनशी लढू शकत नाही असे भाजप सरकार चीनलाच सांगते आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अनेकदा त्यांचा टीआरपी घसरला. त्या प्रत्येक वेळी त्यांनी सावरकरांवर अस्थानी टीका करून यात्रेचा टीआरपी वर आणण्याचा प्रयत्न केला. केरळ कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश या चारही राज्यांमधून भारत जोडो यात्रा जाताना त्यांचा टीआरपी घसरला होता पण या प्रत्येक राज्यांमध्ये कुठे ना कुठे यात्रेदरम्यान सावरकरांची पोस्टर्स लागली. राहुल गांधींनी मध्येच सावरकरांचे तथाकथित माफीपत्र दाखवले आणि त्यामुळे राहुल गांधींच्या आणि भारत जोडो यात्रेच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या. यात्रेचा टीआरपी थोडा वर गेला.
आता देखील काँग्रेसचे महाअधिवेशन रायपूर मध्ये होत असताना काँग्रेसच्या बाकीच्या बातम्यांऐवजी सोनिया गांधींच्या निवृत्तीच्या बातम्या जास्त आल्या. पण काँग्रेससाठी टीआरपी वर उचलेना, त्यावेळी राहुल गांधींनी सावरकरांवरच टीका करून काँग्रेसचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पण सावरकरांवरच्या अस्थानी टीकेसाठी त्यांनी सावरकरांच्या 26 फेब्रुवारीचा पुण्यतिथीचा दिवस निवडला आहे, हा औचित्य भंग झाला आहे.
Rahul criticizes Savarkar even on his death anniversary
महत्वाच्या बातम्या
- कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही; तरी सुप्रिया सुळेंकडून दिशाभूलीचे ट्विट; दादा भुसेंचीही अजब मागणी
- लंडनहून येऊन तरुणीने कसब्यात बजावला मतदानाचा हक्क; पण राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे पाटलांनी केला गोपनीयतेचा भंग!!
- काँग्रेस अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस : राहुल गांधी आणि खरगे यांचे भाषण; त्यानंतर दुपारी 3 वाजता मेगा रॅली
- द फोकस एक्सप्लेनर : राहुल गांधी काँग्रेसचा चेहरा, तर मल्लिकार्जुन खरगे आघाडीचा; 2024 मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?
- बायडेनने पाकिस्तानला सुरूच ठेवली लष्करी मदत : निक्की हेली म्हणाल्या- राष्ट्राध्यक्ष झाले तर शत्रूंना फंडिंग बंद करेन