काँग्रेसला नव्हे, तर “राहुल काँग्रेसला” diplomatic win आणि diplomatic झटका यांच्यातला फरक तरी समजतोय का??, असे विचारायची वेळ जयराम रमेश यांच्यासारख्या काँग्रेसच्या “उच्चशिक्षित” मुख्य प्रवक्त्याच्या “डबल” वक्तव्यामुळे आली.Rahul Congress doesn’t understand diplomatic win of Modi
कारण 1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ज्या भाषेत “समजावून” सांगितले होते, त्याच भाषेत किंबहुना काही प्रमाणात त्यापेक्षा अधिक कठोर भाषेत विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना “समजावून” सांगितले, पण काँग्रेसच्या नव्हे, तर “राहुल काँग्रेसच्या” मुख्य प्रवक्त्यांना त्यातले राजकीय इंगित समजलेच नाही, असे म्हणावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला. तुम्ही कॅनडाहून भारतात परत जाताना अमेरिकेत काही वेळ थांबू शकाल का?, आपली भेट होऊ शकेल का?, असा सवाल केला. परंतु मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलेले “जाळे” ओळखले आणि ते त्याच्यात फसले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचा स्वयंघोषित मार्शल असीम मुनीर याला diplomatic lunch दिले. त्याच वेळी नरेंद्र मोदींना परस्पर त्यात सामील करून घ्यायचा ट्रम्प यांचा डाव होता, पण मोदींनी ट्रम्प यांच्या निमंत्रणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि ते आपल्या नियोजित क्रोएशिया दौऱ्यावर निघून गेले.
मोदींचा झटका
35 मिनिटांच्या फोन कॉल मध्ये पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना बरेच सुनावले. भारत आणि पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधीत अमेरिकेचा कुठलाही “व्यापार हस्तक्षेप” नाही. भारताने तो कधीही स्वीकारला नाही. यापुढेही स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. कारण operation sindoor
दरम्यान अमेरिका आणि भारत यांच्यात कुठलीही चर्चाच झाली नाही, असे मोदींनी ट्रम्प यांना सांगितले. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे 13 वेळा credit घेतले. ते मोदींनी एका झटक्यात काढून घेतले.
– जयराम रमेश चुकले
पण “राहुल काँग्रेसचे” प्रवक्ते जयराम रमेश यांना हा भारताचा diplomatic win वाटला नाही, तर तो भारतालाच बसलेला diplomatic झटका वाटला. पंतप्रधान मोदी 37 दिवस गप्प बसले आणि नंतर त्यांनी फोन कॉल वर ट्रम्प यांना काय सांगितले?, हे भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पत्रकारांना सांगितले. मोदी स्वतः कुणाशीच बोलले नाहीत. मोदींच्या वतीने परराष्ट्र सचिवांनी केलेले निवेदन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेले निवेदन या तफावत आढळली, असा दावा जयराम रमेश यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला diplomatic झटका दिल्याचे जयराम रमेश म्हणाले.
पण हा दावा करताना जयराम रमेश यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे जुने निवेदन वाचले. ते माध्यमांनी उघडकीस आणले. जयराम रमेश expose झाले म्हणून त्यांना माफी मागावी लागली. पण ही माफी देखील त्यांनी सरळपणे मागितली नाही, तर मोदींना ट्रिपल झटका बसल्याचा “जावई शोध” त्यांनी लावला. मोदी काहीही करोत किंवा न करोत, त्यांच्यावर टीकाच करायची हे धोरण अवलंबल्याने “राहुल काँग्रेसच्या” मुख्य प्रवक्त्यांना diplomatic win आणि diplomatic झटका यांच्यातला फरक समजला नाही.
– इंदिरा + नरसिंह रावांचे अमेरिकेला झटके
वास्तविक याआधी इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन यांना आणि पी. व्ही. नरसिंह राव यांनी बिल क्लिंटन यांना असे diplomatic झटके दिले होते. इंदिरा गांधींनी 1971 च्या युद्धाच्या वेळी निक्सन यांचा “तटस्थ” राहण्याचा सल्ला ऐकला नव्हता. अमेरिकेच्या सातव्या आरमाराच्या सातव्या आरमाराच्या धमक्यांना भीक घातली नव्हती. भारताची सैनिकी आणि राजनैतिक क्षमता त्यांनी दाखविली होती. भारताने अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर (NPT) आणि अणुचाचणी बंदी करारावर (CTBT) सही करायासाठी बिल क्लिंटन यांनी दबाव आणला होता. पण नरसिंह राव यांनी तो झुगारून लावला होता. त्या उलट नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे खासगीकरण करून अमेरिकन उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले. त्याचा मोठा लाभ भारताला झाला.
इंदिरा गांधी आणि नरसिंह राव या मूळ काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय कसोटीच्या काळात दोन अमेरिकन अध्यक्षांना diplomatic झटके दिले होते. याविषयी जयराम रमेश यांचा एक विशिष्ट अभ्यास नक्की आहे. कारण त्यांनी त्याविषयी काही पुस्तके लिहिली आहेत. कारण ते त्यावेळी मूळ काँग्रेसचे नेते होते.
इंदिरा गांधी आणि नरसिंह राव यांनी अमेरिकन अध्यक्षांना जसा झटका दिला, तसाच झटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. पण जयराम रमेश यांना तो पचला नाही कारण सध्या “राहुल काँग्रेस” नावाच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. म्हणूनच उलटी पालटी विधाने करून ते मोकळे झाले.
Rahul Congress doesn’t understand diplomatic win of Modi
महत्वाच्या बातम्या
- एकीकडे इराण-इस्रायल युद्ध, दुसरीकडे झेलेन्स्कीने घेतला मोठा निर्णय
- पाकिस्तान विरुद्ध Operation Sindoor, इराण मधून भारतीयांच्या सुटकेसाठी Operation Sindhu सुरू!!
- Chhattisgarh : छत्तीसगड-आंध्र सीमेवर चकमकीत तीन मोठे नक्षलवादी नेते ठार
- ED raids : दिल्लीत EDची ३७ ठिकाणी छापेमारी; जाणून घ्या, काय आहे प्रकरण?