• Download App
    राहूल बजाज यांचा बॉंबे क्लब आणि इंदिरा गांधी, नरसिंह राव या कॉँग्रेसच्या पंतप्रधानांनी पंगा|Rahul Bajaj's Bombay Club and conflict with Indira Gandhi, Narasimha Rao, the Prime Minister of the Congress

    राहूल बजाज यांचा बॉंबे क्लब आणि इंदिरा गांधी, नरसिंह राव या कॉँग्रेसच्या पंतप्रधानांनी पंगा

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राहूल बजाज आणि बॉंबे क्लब यामुळे एकेकाळी देशात खूप चर्चा झाली होती. बजाज यांचा लायसन्स राजला विरोध असला तरी स्थानिक कंपन्यांना संधी मिळावी अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी कॉँग्रेसच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरसिंह राव यांच्याशीही पंगा घेतला होता.Rahul Bajaj’s Bombay Club and conflict with Indira Gandhi, Narasimha Rao, the Prime Minister of the Congress

    १९९१ मध्ये भारतात उदारीकरणाचे वारे सुरू झाल्यावर लायसन्स राज संपवून परदेशी कंपन्यांसाठी बाजाराची दारे उघडण्यात आली. या कंपन्यांकडे उच्च तंत्रज्ञान, आर्थिक ताकद आणि अनुभव होता. त्यामुळे राहूल बजाज आणि काही उद्योगपती अर्थमंत्र्यांना भेटले. त्यांनी याबाबतचे प्रेझेंटेशन दिले. मात्र, त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉँग्रेस पक्षाच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की याबाबत जाहीर काहीही बोलू नका.



    मात्र, राहुल बजाज यांनी जाहीर बोलायला सुरूवात केली. त्यामुळे त्यांच्यावर उदारीकरण धोरणाचे विरोधी अशी टीका झाली. मात्र, बजाज यांनी स्पष्ट केले की ते उदारीकरणाच्या विरोधात नाहीत तर देशी कंपन्यांना समान संधी मिळावी अशा मताचे होतो.

    ऐवढेच नव्हे तर देशात इंदिरा गांधींचे सरकार असताना त्यांनी देशात लायसन्स राजविरोधात आवाज उठवला होता, असे म्हटले जाते. या नियमामुळे स्कूटर खरेदी करणाऱ्यांना स्कूटर बुक करूनही ती मिळवण्यासाठी महिनोनमहिने वेळ लागत असे. राहुल बजाज यांनी लायसन्स राजला उघड विरोध केला होता. यासाठी मला तुरुंगात जावे लागले तरी मी जाईन, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

    मी काळजी करणार नाही हे परवाना राज नंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून परवाना राज बंद केले. तेव्हापासून देशात आर्थिक सुधारणा सुरू झाल्या.राहूल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही पंगा घेतल होता. इकनॉमिक टाइम्सच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये देशातील आघाडीचे उद्योजकांसोबत केंद्रीय गृहमंत्र्यासोबत चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं.

    येथील काही निवडक उद्योजकांनी अमित शाह यांना उद्योग जगताबरोबरच देशातील समस्यांसंदर्भात प्रश्न विचारले. देशात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक सरकारवर टीका करण्यासही घाबरत आहेत. लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा का नाही? असा थेट प्रश्न माईक हातात येताच राहुल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना विचारला.

    त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, तसेच तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले होते की, सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही? लोकांना युपीएच्या सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र, सध्याच्या सरकारने भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले आहे. युपीए-२ च्या कार्यकाळात आम्ही कोणावरही टीका करु शकत होतो.

    यावर अमित शाह म्हणाले होते की, देशात कुठल्याही प्रकारच्या भीतीचे वातावरण नाही. कोणालाही घाबरण्याचे कारण नाही. मोदी सरकारवर माध्यमांमधून कायमच टीका होत राहिली आहे. तरीही तुम्ही म्हणत असाल की देशात असे वातावरण आहे तर ही परिस्थिती बदलण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल. सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत आहे. कोणती टीका होत असेल तर त्याला गांभिर्याने घेत आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करीत असतो.

    Rahul Bajaj’s Bombay Club and conflict with Indira Gandhi, Narasimha Rao, the Prime Minister of the Congress

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’