• Download App
    पद्म पुरस्कारविजेते ज्येष्ठ शिल्पकार मोहपात्रा यांचे कोरोनाने निधन Raghunath Mohpatra no more

    पद्म पुरस्कारविजेते ज्येष्ठ शिल्पकार मोहपात्रा यांचे कोरोनाने निधन

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सर्वच पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले ज्येष्ठ शिल्पकार रघुनाथ मोहपात्रा (वय ७८) यांचे एम्स रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. सरकारने २०१८ मध्ये त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. Raghunath Mohpatra no more

    संसदेच्या सेंट्रल हॉल येथे असलेले सूर्यदेवाचे साकारलेले सहा फुटी शिल्प मोहपात्रा यांनी बनविले होते. तसेच पॅरिस येथील बुद्ध मंदिरात लाकडापासून बुद्धाचे शिल्प त्यांनी तयार केले आहे.
    पुरी जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील खपुरिया गावात २४ मार्च १९४३ रोजी रघुनाथ मोहपात्रा यांचा जन्म झाला होता. शालेय जीवनापासूनच त्यांना शिल्पकलेचा छंद होता.



    मंदिराच्या स्थापत्यशैलीतील पारंपारिक शैली जोपासणारे मोहपात्रा यांनी वयाच्या २२ व्या वर्षीच शिल्पकलेत राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. शिल्पकला प्रेमींच्या मदतीने आणखी एक जगविख्यात कोणार्क मंदिर उभारण्याचा त्यांचा मानस होता. परंतु ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

    Raghunath Mohpatra no more

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट