• Download App
    राफेलची गर्जना, भारतीय शस्त्रास्त्र बसविण्याचे काम सुरू होणार|Rafel's roar, the work of installing Indian weapons will begin

    राफेलची गर्जना, भारतीय शस्त्रास्त्र बसविण्याचे काम सुरू होणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत-फ्रान्स दरम्यान झालेल्या राफेल विमानांच्या खरेदीपैकी भारताला आत्तापर्यंत ३० विमान सुपूर्द करण्यात आली आहेत. उर्वरित सहा विमानांची शेवटची खेप पुढील वर्षी एप्रिल २०२२ पर्यंत मिळणार आहे. जानेवारी महिन्यापासून या विमानांचं अपग्रेडिंग अर्थात त्यामध्ये भारतीय शस्त्रास्त्र बसवण्याचं काम सुरु होणार आहे.Rafel’s roar, the work of installing Indian weapons will begin

    भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या एका उच्चस्तरीय टीम लढाऊ विमानांच्या कामगिरीचं मुल्यांकन करण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झाली आहे. या विमानांमध्ये भारतातील विशिष्ट शस्त्रे बसवण्यात येणार आहेत. सन २०१६ फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये डीलदरम्यान यावर सहमती झाली होती.



    राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय झाला त्याचवेळी भारतीय शस्त्रास्त्रे त्यामध्ये बसविण्याचे ठरले होते. यामुळे विमानांची मारक क्षमता वाढणार आहे. राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील २ एम८८-२ इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे ७५ केएन थ्रस्टचे आहे.राफेल लढाऊ विमाने हवेतही एकमेकांना मदत करू शकतात. ही विमाने ही हवेत इंधन भरू शकतात आणि एकमेकांना इंधने भरण्यास मदत करू शकतात.

    दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी या विमानातून मेटिओर क्षेपणास्त्र नेले जाऊ शकते. मेटिओर हे क्षेपणास्त्र दृष्टिक्षेपापलिकडचे लक्ष्य हवेतून हवेत भेदू शकते. १०० किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते.स्काल्प क्षेपणास्त्र हे जमिनीवरचे ३०० किलोमीटर दूर असलेले लक्ष्य भेदू शकते. राफेलमध्ये स्काल्प क्षेपणास्त्र ठेवता येईल. हे जमिनीवर लांब पल्ल्यावर हल्ला करू शकते. ३०० किलोमीटरच्या परिघात लक्ष्य भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.

    राफेल विमानात एका वेळी ६ आस्म क्षेपणास्त्रे वाहण्याची क्षमता आहे. प्रत्येक आस्म क्षेपणास्त्राला जीपीएस आहे आणि इमेजिंग टरमिनल गायडन्स आहे. अगदी अचूकतेने १० मीटर्सपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.याला होलोग्राफिक कॉकपिट आहे.राफेल एका वेळी ८ लक्ष्य साध्य करू शकते.

    Rafel’s roar, the work of installing Indian weapons will begin

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ओवैसींच्या चिंतेत भर, भाजपच्या माधवी लता मुस्लिमांमध्येही प्रचंड लोकप्रिय, हैदराबादेत आव्हान

    शिवराज सिंह चौहान यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची चिन्हं!

    2 – 0 आघाडी : फुटबॉलच्या परिभाषेत पंतप्रधान मोदींनी कोल्हापूरकरांना समजावला विजयाचा फॉर्म्युला!!