Rafale deal : पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार चर्चेत आला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, आज कॉंग्रेस पक्ष खोटारडेपणा आणि भ्रमनिरास याचा समानार्थी बनला आहे. संबित पात्रा म्हणाले की, आज पुन्हा कॉंग्रेसने राफेलबद्दल खोटे वक्तव्य करून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. Rafale deal Sambit Patra accuses Rahul Gandhi of lying, said- statement changed continuously about rafale cost
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुन्हा एकदा राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार चर्चेत आला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, आज कॉंग्रेस पक्ष खोटारडेपणा आणि भ्रमनिरास याचा समानार्थी बनला आहे. संबित पात्रा म्हणाले की, आज पुन्हा कॉंग्रेसने राफेलबद्दल खोटे वक्तव्य करून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
ते पुढे म्हणाले की, 2019च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधींनी जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला, तोही त्यांच्या कामी आला नाही. मोदीजींना जनतेच्या न्यायालयात मोठा विजय मिळाला आणि आमचे सरकार स्थापन झाले. संबित पात्रा म्हणाले की, राफेलच्या किंमतींबाबत राहुल गांधींनी वारंवार वक्तव्ये बदलली आहेत.
संबित पात्रा म्हणाले की, फ्रान्समधील एका स्वयंसेवी संस्थेने राफेलबद्दल तक्रार केली आहे आणि त्यासाठी तेथे न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु राहुल गांधी आणि कॉंग्रेस ज्या प्रकारे या संपूर्ण घटनेबाबत राजकारण सुरू करत आहेत, ते वाईट आहे. ते पुढे म्हणाले की, चौकशीचा प्रश्न आहे तर सर्वोच्च न्यायालयाने आणि कॅगने राफेलविषयी आपला अहवाल जनतेसमोर ठेवला आहे. हे दोन्ही अहवाल हिंदुस्थानी जनतेने पाहिले आहेत.
Rafale deal Sambit Patra accuses Rahul Gandhi of lying, said- statement changed continuously about rafale cost
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना EDने बजावला तिसरा समन्स; 5 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- Pushkar Singh Dhami Profile : वडील सैन्यात, कोश्यारींचे शिष्य.. जाणून घ्या उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींबद्दल सबकुछ
- यूपी जि.पं. निवडणुकीत 75 पैकी 65 जागांवर भाजपचा झेंडा; सपाला मोठा झटका, काँग्रेसने गमावला जनाधार
- ED raids : धर्मांतराशी संबंधित PMLA प्रकरणी दिल्ली आणि यूपीच्या 6 जागांवर छापेमारी, गत महिन्यात दाखल केला होता गुन्हा
- Jagannath Yatra : का काढली जाते भगवान जगन्नाथांची रथयात्रा, आख्यायिका काय सांगतात? जाणून घ्या वैशिष्ट्य!