• Download App
    Bangladesh मोहम्मद युनूसची लंडनमध्ये बसून बडबड; बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांच्या ऐतिहासिक घराची तोडफोड; पण ममता बॅनर्जी गप्प!!

    Bangladesh : मोहम्मद युनूसची लंडनमध्ये बसून बडबड; बांगलादेशात रवींद्रनाथ टागोरांच्या ऐतिहासिक घराची तोडफोड; पण ममता बॅनर्जी गप्प!!

     

    नाशिक : बांगलादेशचा नोबेल पुरस्कार विजेता अर्थतज्ञ हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि भारत सरकार यांच्या विरोधात बडबड केली. त्याचवेळी इस्लामी जिहाद्यांनी बांगलादेशात महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या पैतृक घराची तोडफोड केली, पण एवढे सगळे होऊ नाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र गप्पा राहिल्या.

    बांगलादेशातल्या लोकशाहीवादी सरकारला हटवून नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद युनूस खुर्चीवर जाऊन बसला. त्याच्याच राजवटीत हजारो हिंदूंचे शिरकाण झाले, तरी देखील त्याने इस्लामी जिहाद्यांवर कुठली कारवाई केली नाही. उलट चीनची चुंबचुंबी करून तो भारताविरुद्ध गरळ ओकत राहिला. आपल्या चार दिवसांच्या लंडन दौऱ्यात देखील मोहम्मद युनूसने तेच केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख हसीना यांच्यावर प्रतिबंध लादले नाहीत. त्यामुळे त्या भारतात बसून ऑनलाईन भाषणे करून बांगलादेशात असंतोष पसरवत आहेत, असा आरोप मोहम्मद युनूसने लंडनमधून केला.

    त्याचवेळी बांगलादेशात इस्लामी जिहाद्यांनी महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या पैतृक घराची तोडफोड केली. रवींद्रनाथ टागोर यांचे आजोबा द्वारकानाथ टागोर यांनी ढाक्यापासून 125 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिराजगंज मध्ये 1840 मध्ये दुमजली घर बांधले होते. ते बांगलादेशच्या सरकारने रवींद्रनाथ टागोर यांचे स्मारक म्हणून जाहीर केले होते. तिथे त्यांच्या स्मृती वेगवेगळ्या पद्धतीने जपल्या होत्या, पण मोहम्मद युनूस याच्या जिहादी राजवटीच्या काळात इस्लामी जिहाद्यांनी नंगानाच घालून रवींद्रनाथ टागोर यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली. त्यांच्या विविध वस्तूंची जाळपोळ केली. त्याबद्दल मोहम्मद युनूस याने एक शब्दही उच्चारला नाही. त्याने फक्त भारताविरुद्ध दुगाण्या झोडल्या.

    किर स्टार्मरने भेट नाकारली

    त्याचवेळी त्याने शेख हसीना विरुद्धची मोहीम लंडनमध्ये तेज केली. ब्रिटिश पंतप्रधान किर स्टार्मर यांची भेट मागितली. शेख हसीना यांनी आपल्या राजवटीत बांगलादेशाला लुटले आणि तिथला पैसा आणून लंडनमध्ये गुंतवला. तो परत मागण्यासाठी आपल्याला कीर स्टार्मर यांची भेट हवी आहे, पण त्यांनी ती दिली नाही, असा कांगावा मोहम्मद युनूसने केला. रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची तोडफोड झाली. त्याविषयी मोहम्मद युनूसने चकार शब्दही उच्चारला नाही‌.

    पण एरवी भारतात बंगाली संस्कृतीचा गाजावाजा करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील बांगलादेश मधल्या घटनेचा एका शब्दानेही निषेध केला नाही. गुजरात मधून येऊन बंगालमध्ये दंगल माजविणाऱ्यांना राज्यात स्थान मिळणार नाही, असा ढोल ममता बॅनर्जींनी अनेकदा पिटला. त्यात आपण नरेंद्र मोदी आणि अमित शाहा या दोन भारतीय नेत्यांना हिणवत आहोत याचे भानही त्यांनी राखले नाही, पण बांगलादेशात महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या पैत्रृक घराची तोडफोड झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपले तोंड उघडले नाही.

    Rabindranath Tagore’s historic house vandalized in Bangladesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे